पहिल्यासारखे
श्वास पहिल्यासारखे, नि:श्वास पहिल्यासारखे
लाडक्या येतील का मधुमास पहिल्यासारखे?
पाहणे मी वाट, येण्याची तुलाही ओढशी
आजही होतात मजला भास पहिल्यासारखे
आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
छेड आधीसारखा, दे त्रास पहिल्यासारखे
आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे
कष्टणे दिवसा, तुझे झोपू न देणे रातचे
एकदा व्हावेत सासुरवास पहिल्यासारखे
दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 05/01/2009 - 11:02
Permalink
गंध लगडावे तुझ्या...
सन्माननीय गौतमी,
छान रचना आहे. 'खास' हा शेर आवडला. सन्माननीय कवयित्री चांदणी लाड यांच्या 'खास जागी' च्या जवळपास गेलेला आहे आपला 'खास गुंते' हा शेर!
प्रसाद लिमये
सोम, 05/01/2009 - 18:56
Permalink
आजही मी
आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे
दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे
हे दोन्ही छान....... सुंदर
केदार पाटणकर
मंगळ, 06/01/2009 - 10:13
Permalink
छान
छान गझल.
सुबकता आहेच. सरावाने अधिक सफाई येईल.
गंध लगडावे..हा शेर तर केवळ झकास. अंदाज...कातिलाना !
आपण लिहीत रहा. शुभेच्छा!
दशरथयादव
मंगळ, 06/01/2009 - 12:54
Permalink
शेर
शेर आवडले
सुरेख..........
आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
संपले सारे पुराणे त्रास पहिल्यासारखे
आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे
दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे
गौतमी
बुध, 07/01/2009 - 18:57
Permalink
आभार
भूषणजी, प्रसादजी, केदारजी, दशरथजी,
खूप खूप आभार!
केदारजी,
आपले मार्गदर्शन मिळू शकेल काय?
चित्तरंजन भट
बुध, 07/01/2009 - 21:54
Permalink
वा!
आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
संपले सारे पुराणे त्रास पहिल्यासारखेछान.. या द्विपदीत पुराणे नको होते का? पहिल्यासारखे आणि पुराणे शेवटी जुन्या काळातच नेत आहेत असे वाटते.
आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखेवा..
दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे
वाव्वा...
गझल आवडली.
पुलस्ति
बुध, 07/01/2009 - 22:14
Permalink
छान!
भास आणि गंध हे शेर आवडले!
गौतमी
गुरु, 08/01/2009 - 10:03
Permalink
द्विपदी
पुलस्तीजी
खूप आभार!
चित्तरंजनजी
दाद दिल्याबद्दल तसेच सुधारणा सुचवल्याबद्दल खूप आभार. द्विपदी थोडी बदलली आहे. बदल कसा आहे यावर मतप्रदर्शन व्हावे अशी इच्छा आहे.
'सासुरवास' ही एक नवीन द्विपदी रचून सादर करत आहे. रसिकांना भावेल अशी अपेक्षा!
प्रसाद लिमये
गुरु, 08/01/2009 - 11:30
Permalink
बदल सुरेख,
बदल सुरेख, नवीन शेर ही छान
चांदणी लाड.
गुरु, 08/01/2009 - 14:05
Permalink
दे त्रास पहिल्यासारखे..
श्वास पहिल्यासारखे, नि:श्वास पहिल्यासारखे
लाडक्या येतील का मधुमास पहिल्यासारखे?
आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
छेड आधीसारखा, दे त्रास पहिल्यासारखे (हाय!! क्या बात है!)
संपूर्ण गझल आवडली...हे शेर खास आवडले.
अर्चना लाळे
गुरु, 08/01/2009 - 17:12
Permalink
गुंते काय?
केसातले गुंते कोण कशाला शोधेल? मी लहान आहे. पण कायतरीच वाटले.
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे
गंध लगडावे हे काव्य चांगले वाटले.
केदार पाटणकर
शुक्र, 09/01/2009 - 12:39
Permalink
मार्गदर्शन
मार्गदर्शन करण्याएवढा मी मोठा नाही.
स्थळावर बरेच तज्ज्ञ आहेत.
विनंती, सूचना, बदल सुचवणे..या गोष्टी करत आलो आहे, यापुढेही करेन.
आपापसात चर्चा केल्यानेही खूप फायदा होतो.
चित्तरंजन भट
शुक्र, 09/01/2009 - 13:09
Permalink
आवडला
बदल चांगला आहे. ती ओळ अधिक प्रवाही झाली आहे.
सुनेत्रा सुभाष
रवि, 11/01/2009 - 11:00
Permalink
सुरेख गझल
गझल खूपच सुरेख आहे.
यावरची गम्भीर समीक्षकांची समीक्षा वाचायला खूप आवडेल.
गौतमी
सोम, 12/01/2009 - 20:48
Permalink
गुंते
अर्चना,
लहान मी पण आहे. अगदी लहान नाही, पण तशी लहानच.
पण गुंते शोधणेचा अर्थ कळेल तुला.
तुझे खूप आभार!
गंभीर समीक्षक
सोम, 12/01/2009 - 22:37
Permalink
पहिल्यासारखे...
श्वास पहिल्यासारखे, नि:श्वास पहिल्यासारखे
लाडक्या येतील का मधुमास पहिल्यासारखे?
एक प्रश्न! एका स्त्रीने आपल्या प्रियकराला वा पतीला विचारलेला! गझलेचा विचार! आयुष्य आपली वळणे घेत जात आहे. काळानुसार खूप बदल होतात. ( पुढील एका शेरावरून संबोधित व्यक्ती पती असणार हे सिद्ध होत आहेच ) पती आपल्या व्यावसायिक बंधनांमधे जखडलेला. अशाच एका कातरवेळी ( कवयित्रीसाठी कवी हा शब्द वापरत आहोत, नेहमीप्रमाणे ) कवीला जुन्या काळाची आठवण होते. सुनेत्रा सुभाष यांच्या 'डोल सख्यारे' नंतर पहिल्यांदा समीक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. कदाचित आम्हीही आमच्या सहधर्मचारिणीला सर्व काही देऊ शकलो नसू. वाईट वाटते. आता तो काळही गेला. सहज अन घुसणारा शेर!
पाहणे मी वाट, येण्याची तुलाही ओढशी
आजही होतात मजला भास पहिल्यासारखे
हा कवी सुटला आहे. आम्ही जास्ती काहीही लिहू शकत नाही.
धन्यवाद!
गंभीर समीक्षक
आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
छेड आधीसारखा, दे त्रास पहिल्यासारखे
आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे
कष्टणे दिवसा, तुझे झोपू न देणे रातचे
एकदा व्हावेत सासुरवास पहिल्यासारखे
दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे
भिकारदास मारुती
सोम, 12/01/2009 - 23:37
Permalink
नाही
नाही येणार.
आम्ही ब्रह्मचारी!
मानस६
मंगळ, 13/01/2009 - 08:18
Permalink
दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे....
लाघवी शब्द-योजना असलेली गझल.. उत्तम
-मानस६