ओठी तुझ्या..

ओठी तुझ्या गझल माझी
बघ कुठवरी मजल माझी


ही काळजाच्या किनारी
शब्दासवे सहल माझी


हल्ले किती त्या सुखाचे
दु:खे परी अचल माझी


सुकले जरी ओठ माझे
ही लोचने सजल माझी


दुनियेस ह्या का न समजे?
ही वेदना सरल माझी


नजरेस तू नजर देता
झाली सफल गझल माझी


(जयन्ता५२)


  


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

श्री जयन्ता ५२,
सुखाचे हल्ले हा फार सुंदर शेर आहे.
शुभेच्छा व धन्यवाद!

ओठी तुझ्या गझल माझी
बघ कुठवरी मजल माझी
.. वाहव्वा! मतला फार म्हणजे फारच  आवडला.
तसेच  सुखाचे  हल्ले  हा शेरही  झकास.
धन्यवाद आणि शुभेच्छा.