ओठी तुझ्या..
ओठी तुझ्या गझल माझी
बघ कुठवरी मजल माझी
ही काळजाच्या किनारी
शब्दासवे सहल माझी
हल्ले किती त्या सुखाचे
दु:खे परी अचल माझी
सुकले जरी ओठ माझे
ही लोचने सजल माझी
दुनियेस ह्या का न समजे?
ही वेदना सरल माझी
नजरेस तू नजर देता
झाली सफल गझल माझी
(जयन्ता५२)
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 24/11/2008 - 11:43
Permalink
सुंदर शेर!
श्री जयन्ता ५२,
सुखाचे हल्ले हा फार सुंदर शेर आहे.
शुभेच्छा व धन्यवाद!
ज्ञानेश.
मंगळ, 25/11/2008 - 10:46
Permalink
मतला...
ओठी तुझ्या गझल माझी
बघ कुठवरी मजल माझी.. वाहव्वा! मतला फार म्हणजे फारच आवडला.
तसेच सुखाचे हल्ले हा शेरही झकास.
धन्यवाद आणि शुभेच्छा.