हाक
कविवर्य सुरेश भट यांचा आज (14 मार्च) स्मृतिदिन.
त्यांना विनम्र श्रद्धांजली.
...........................................................
हाक
...........................................................
दालनात दालने नि दालनात दालने
एक देह...त्यात ही मनातली किती मने !
बासरी तुझी घुमे चहूकडे अजूनही...
राहिलीत ही तुझी इथे चुकून स्पंदने !
मोकळेपणातही जरा न मोकळेपणा...
घातली कुणावरी जरी कुणी न बंधने
ये निदान तू तरी...समीप ये, समीप ये...
तू कशास राहतेस दूर दूर वंचने ?
मी विचारले नभास, ` जायचे पुढे कुठे ? -
- संपले समुद्र सात...सात संपली वने...`
थांबवायचे कसे मनातले विचार हे....?
एकसारखीच ही सुसाटतात वाहने
मी चुकूनही कधीच ओ न द्यायचो, तरी -
हाक मारलीस का मला चुकून वेदने ?
- प्रदीप कुलकर्णी
गझल:
प्रतिसाद
प्रसाद लिमये
शनि, 15/03/2014 - 19:11
Permalink
दालनात दालने नि दालनात दालने
दालनात दालने नि दालनात दालने
एक देह...त्यात ही मनातली किती मने !
मोकळेपणातही जरा न मोकळेपणा...
घातली कुणावरी जरी कुणी न बंधने
मी विचारले नभास, ` जायचे पुढे कुठे ? -
- संपले समुद्र सात...सात संपली वने...`
मी चुकूनही कधीच ओ न द्यायचो, तरी -
हाक मारलीस का मला चुकून वेदने ?
वरील शेर फार फार आवडले
गझल सुंदर
केदार पाटणकर
मंगळ, 18/03/2014 - 11:25
Permalink
प्रदीप, नेहमीसारखीच सफाईदार.
प्रदीप,
नेहमीसारखीच सफाईदार.
चित्तरंजन भट
मंगळ, 18/03/2014 - 16:54
Permalink
थांबवायचे कसे मनातले विचार हे
थांबवायचे कसे मनातले विचार हे....?
एकसारखीच ही सुसाटतात वाहने
वा!
प्रदीप कुलकर्णी
सोम, 24/03/2014 - 21:47
Permalink
सगळ्यांचे मनापासून आभार !
सगळ्यांचे मनापासून आभार !
अनंत ढवळे
बुध, 16/04/2014 - 09:54
Permalink
मोकळेपणातही जरा न मोकळेपणा...
मोकळेपणातही जरा न मोकळेपणा...
घातली कुणावरी जरी कुणी न बंधने
अप्रतिम शेर आहे. बंधनांमध्ये अडकण्यात सुख मानणार्या मानवी मनाचे सुरेख चित्रण..
अनंत ढवळे
बुध, 16/04/2014 - 09:54
Permalink
मोकळेपणातही जरा न मोकळेपणा...
अनंत ढवळे
बुध, 16/04/2014 - 09:55
Permalink
मोकळेपणातही जरा न मोकळेपणा...
मोकळेपणातही जरा न मोकळेपणा...
घातली कुणावरी जरी कुणी न बंधने
अप्रतिम शेर आहे. बंधनांमध्ये अडकण्यात सुख मानणार्या मानवी मनाचे सुरेख चित्रण..
बेफिकीर
शुक्र, 09/05/2014 - 14:55
Permalink
sarvaanshee sahamat! subak va
sarvaanshee sahamat! subak va surekh gazal!
वैभव वसंतराव कु...
शुक्र, 09/05/2014 - 22:22
Permalink
जमीन फार आवडली अनेक शेर आणि
जमीन फार आवडली अनेक शेर आणि मिसरे आवडले
वाहने चा शेर सर्वाधिक आवडला
supriya.jadhav7
रवि, 24/08/2014 - 16:38
Permalink
बाप रे !
बाप रे !
काय एक एक शेर आहेत !
प्रतिमा शेरात अशा काही बेमालूमपणे गुंतवल्या गेल्या आहेत की जणू कोंदणातले हिरे.
नतमस्तक !
धन्यवाद !!
बाळ पाटील
शुक्र, 12/09/2014 - 16:05
Permalink
मी चुकूनही कधीच ओ न द्यायचो,
मी चुकूनही कधीच ओ न द्यायचो, तरी -
हाक मारलीस का मला चुकून वेदने ?
सुरेख, अतिशय सुरेख. आपल्या एकुणच गझला मस्त भावतात.