... तुरुंग सारे!
**********************************
**********************************
कळा मनीच्या जुळवत होते भणंग सारे
बिनाजळाच्या अवखळ डोही तरंग सारे
उगाच आता नवी कहाणी पुन्हा कशाला
जुना पुरावा, जुनेच किस्से, प्रसंग सारे
कसे फुलावे कसे मिटावे कुणास सांगा
फुलांत बसले लपुन अनोखे भुजंग सारे
जुने नवे घांव बुजवुनी बेफिकीर झालो
चकवुन गेलेच बुडबुडे अन तवंग सारे
सुरा-सुधेचा उगाच बाऊ करुन बसली
भली बुरी ही व्रतस्थ सत्ये,अभंग सारे
कसे जपावे सुगंध आता मला न ठावे
गुलाबगाणी तुझी कहाणी सवंग सारे
तु जो हवेचा निषेध केला..नवाच होता
इथे जमीनीस बांधलेले....पतंग सारे!!!
खुशीत मैत्रेय चालतो-बोलतो सदा,पण
तुझे इशारे तुझे पसारे तुरुंग सारे......!
***********************************
***********************************
प्रतिसाद
चक्रपाणि
शुक्र, 16/04/2010 - 12:41
Permalink
शेवटच्या शेरात अलामत भंगली
शेवटच्या शेरात अलामत भंगली आहे असे दिसते. येथे मतल्यात अलामत 'अं' अशी निश्चित झाली आहे, ती शेवटच्या शेरात 'उं' झाली. असो.
काही कल्पना आणि सहजतेने आलेल्या ओळी आवडल्या. पाचवा शेर फार आवडला. दुसर्या शेरातील सहजता भावली. त्या शेरात खालच्या ओळीतील किस्से-प्रसंगांचा वरच्या ओळीतील कहाणीशी परस्परसंबंध जितका घट्ट आहे, तितका पुराव्यांचा नाही. खालच्या ओळीत मला पुराव्यांऐवजी पात्रे यावीशी वाटतात - जुनीच पात्रे, जुनेच किस्से, प्रसंग सारे असे जास्त चांगले वाटेल. चू. भू. द्या. घ्या.
जुने नवे वाल्या शेरांत गुणगुणताना अडखळायला झाले.
गंगाधर मुटे
शुक्र, 16/04/2010 - 20:03
Permalink
सुंदर. आवडली.
सुंदर. आवडली.