..प्राण नाही
कृष्णवाणीला जराही राहिलेला त्राण नाही...
...राहिलेला अर्जुनाचाही स्वयंभू बाण नाही
बोथटांचे हे प्रशासन चाललेले छानपैकी..
चेहर्यावरती कुणाच्या कोणताही ताण नाही
पारितोषिक प्राप्त झाले.. सर्व काही स्वच्छ झाले..
कागदोपत्री जराही गाव आमुचे घाण नाही
नोकरीचे काम आहे...टाक पाटी...घाल पाठी...
जीव ओतायास काही हे सतीचे वाण नाही...!
मत्त आणिक मट्ठ लोकांचीच सत्ता सर्व जागी..
कोणत्या खुर्चीत त्यांनी मांडलेले ठाण नाही...?
धुंद तंद्रीतून जागी होत नाही रोषणाई
वेदनेच्या अंधकाराची कुणाला जाण नाही
शुष्क भोगांचीच येथे फक्त जगते प्रेरणाही,
जीवनाची ही कहाणी....जीव आहे.., प्राण नाही..
(संविधानावर कुणाचा राहिला विश्वास आता..?
शासनाचा भास आहे,..श्वास आहे,..प्राण नाही..)
- प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
मंगळ, 13/04/2010 - 16:39
Permalink
बोथटांचे हे प्रशासन चाललेले
बोथटांचे हे प्रशासन चाललेले छानपैकी..
चेहर्यावरती कुणाच्या कोणताही ताण नाही
व्वा!
पारितोषिक प्राप्त झाले.. सर्व काही स्वच्छ झाले..
कागदोपत्री जराही गाव आमुचे घाण नाही
मस्तच.
नोकरीचे काम आहे...टाक पाटी...घाल पाठी...
वेदनेच्या अंधकाराची कुणाला जाण नाही
शुष्क भोगांचीच येथे फक्त जगते प्रेरणाही,
या ओळी आवडल्या.
एकंदर छान.
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 13/04/2010 - 16:54
Permalink
धुंद तंद्रीतून जागी होत नाही
धुंद तंद्रीतून जागी होत नाही रोषणाई
वेदनेच्या अंधकाराची कुणाला जाण नाही
सुरेख
शुष्क भोगांचीच येथे फक्त जगते प्रेरणाही,
जीवनाची ही कहाणी....जीव आहे.., प्राण नाही..
सुंदर
खूप दिवसांनी दिसलात, संतोषराव !
ऋत्विक फाटक
मंगळ, 13/04/2010 - 19:41
Permalink
अप्रतिम गझल! एकूण एक शेर
अप्रतिम गझल!
एकूण एक शेर अफलातून...
कैलास
मंगळ, 13/04/2010 - 21:31
Permalink
शुष्क भोगांचीच येथे फक्त जगते
शुष्क भोगांचीच येथे फक्त जगते प्रेरणाही,
जीवनाची ही कहाणी....जीव आहे.., प्राण नाही.
खरे आहे संतोषराव.......
छान गझल.
डॉ.कैलास
चित्तरंजन भट
मंगळ, 13/04/2010 - 23:42
Permalink
धुंद तंद्रीतून जागी होत नाही
धुंद तंद्रीतून जागी होत नाही रोषणाई
वेदनेच्या अंधकाराची कुणाला जाण नाही
वाव्वा! फार मस्त. क्या बात है.
शुष्क भोगांचीच येथे फक्त जगते प्रेरणाही,
जीवनाची ही कहाणी....जीव आहे.., प्राण नाही..
सुरेख!
संतोषराव, गझल चांगलीच झाली आहे. आणखी येऊ द्या.
मधुघट
बुध, 14/04/2010 - 12:43
Permalink
क्या बात
क्या बात है!!!!
आवडली....संपूर्ण गझलच आवडली!
जीवनाची ही कहाणी....जीव आहे.., प्राण नाही..
बहोत खूब!
ज्ञानेश.
बुध, 14/04/2010 - 13:27
Permalink
मस्त ! सगळेच शेर छान. त्रागा
मस्त ! सगळेच शेर छान.
त्रागा व्यवस्थित व्यक्त झाला आहे.
धुंद तंद्रीतून जागी होत नाही रोषणाई
वेदनेच्या अंधकाराची कुणाला जाण नाही
अप्रतिम.
गंगाधर मुटे
बुध, 14/04/2010 - 21:57
Permalink
बोथटांचे हे प्रशासन चाललेले
बोथटांचे हे प्रशासन चाललेले छानपैकी..
चेहर्यावरती कुणाच्या कोणताही ताण नाही
अप्रतिम.
आनंदयात्री
बुध, 14/04/2010 - 22:15
Permalink
गझल आवडली... :)
गझल आवडली...
:)
संतोष कुलकर्णी
गुरु, 15/04/2010 - 13:24
Permalink
सर्वच प्रतिसाद-दात्यांना
सर्वच प्रतिसाद-दात्यांना मनापासून धन्यवाद.