मात्रा
मनाची अता थांबली काहिली
विषाला विषाचीच मात्रा दिली!
कुठे लोपले कालचे हासणे?
कुठे ती तुझी आज जिंदादिली?
कुणी जाणल्या का नभाच्या व्यथा?
कुणी मातिची यातना पाहिली?
सुखाचा तिथे घोष होईल का?
जिथे वेदनेचीच संथा दिली!
दुभंगून घे माय पोटी अता,
उभा जन्म मी वंचना साहिली
गझल:
प्रतिसाद
कैलास
सोम, 12/04/2010 - 09:04
Permalink
छान....उत्तम गझल. डॉ.कैलास
छान....उत्तम गझल.
डॉ.कैलास
ज्ञानेश.
सोम, 12/04/2010 - 11:07
Permalink
वा वा, उत्तम. सगळेच शेर
वा वा, उत्तम.
सगळेच शेर आवडले.
चित्तरंजन भट
सोम, 12/04/2010 - 16:49
Permalink
मनाची अता थांबली
मनाची अता थांबली काहिली
विषाला विषाचीच मात्रा दिली!
वा! मस्तच.
कुणी जाणल्या का नभाच्या व्यथा?
कुणी मातिची यातना पाहिली?
वाव्वा!
गझल आवडली.
सोनाली जोशी
सोम, 12/04/2010 - 18:30
Permalink
वा मनाची अता थांबली
वा
मनाची अता थांबली काहिली
विषाला विषाचीच मात्रा दिली!
वा! मस्तच.
कुणी जाणल्या का नभाच्या व्यथा?
कुणी मातिची यातना पाहिली?
वाव्वा!
हे दोन्ही फार आवडले
ऋत्विक फाटक
सोम, 12/04/2010 - 20:11
Permalink
सुंदर झालीये गझल.
सुंदर झालीये गझल.
चक्रपाणि
सोम, 12/04/2010 - 23:07
Permalink
गझल आवडली. नभाच्या व्यथा
गझल आवडली. नभाच्या व्यथा सर्वोत्तम वाटल्या.
पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
गंगाधर मुटे
बुध, 14/04/2010 - 22:02
Permalink
गझल आवडली.
गझल आवडली.