भरोसा
वाटे न जे घडावे ऐसे घडेल आता
ज्याचा असे भरोसा तोची नडेल आता
आधार जो निघाला सरली जमीन ऐसी
आहे उभा तरीही वाटे पडेल आता
सर्वांस दु:ख देतो कित्येक शाप घेतो
वाहून नेत्र जाती ऐसा रडेल आता
येताच हाती सत्ता जो ना दिसे कुणाला
गल्लीतल्या सभेला तो सापडेल आता
खुंटून जाई प्रज्ञा इतुके न आळ्सावे
बुद्धीस चालना दे मेंदू सडेल आता
सुग्रास व्यंजनेही रुचली कधीच नाही
''कैल्या''तुला शिळेही घे आवडेल आता.
डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
कैलास
बुध, 24/03/2010 - 18:40
Permalink
योग्य ते बदल करुन प्रकाशित
योग्य ते बदल करुन प्रकाशित केल्याबद्दल विश्वस्तांचे आभार.
डॉ.कैलास
बेफिकीर
बुध, 24/03/2010 - 18:57
Permalink
आहे उभा तरीही वाटे पडेल
आहे उभा तरीही वाटे पडेल आता... हा हा!
गल्लीतल्या सभेला तो सापडेल आता ... हा हा हा!
येताच हाति सत्ता जो ना दिसे कुणाला
गल्लीतल्या सभेला तो सापडेल आता
खुंटून जाइ प्रज्ञा इतुके न आळ्सावे
बुद्धीस चालना दे मेंदू सडेल आता
असे हवे होते का?
लवकरच आशयाच्या प्रवासात कुठेतरी भेटूच!
ऋत्विक फाटक
बुध, 24/03/2010 - 20:35
Permalink
खुंटून जाइ प्रज्ञा इतुके न
खुंटून जाइ प्रज्ञा इतुके न आळ्सावे
बुद्धीस चालना दे मेंदू सडेल आता
सुग्रास व्यंजनेही रुचली कधीच नाही
''कैल्या''तुला शिळेही घे आवडेल आता.
हे दोन चांगले आहेत.
कैलास
बुध, 24/03/2010 - 21:49
Permalink
बेफिकीर आणि ऋत्विक.....आपणां
बेफिकीर आणि ऋत्विक.....आपणां द्वयीने उल्लेखिलेल्या शेरांमुळे ही हझल तर झाली नाही ना ? असे वाटले...असो....
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
डॉ.कैलास
अजय अनंत जोशी
बुध, 24/03/2010 - 23:34
Permalink
फार छान लिहिलेत कैलास. तुमचा
फार छान लिहिलेत कैलास. तुमचा २-३ महिन्यांचा कालावधी पाहता चांगले लिखाण. हझलेकडे वळली आहे. पण असू देत.
येताच हाती सत्ता जो ना दिसे कुणाला
गल्लीतल्या सभेला तो सापडेल आता
येताच हाती सत्ता = च्या ऐवजी "जो ना कधीच दिसला, सत्ताच हात देता..." असे चालेल का..?
शेवटी निर्णय तुमचाच.
गंगाधर मुटे
गुरु, 25/03/2010 - 00:01
Permalink
४,५,६ आवडलेत.
४,५,६ आवडलेत.
कैलास
गुरु, 25/03/2010 - 08:28
Permalink
फार छान लिहिलेत कैलास. तुमचा
फार छान लिहिलेत कैलास. तुमचा २-३ महिन्यांचा कालावधी पाहता चांगले लिखाण. हझलेकडे वळली आहे. पण असू देत.
धन्यवाद अजयसाहेब.
आपण व बेफिकिर यांनी उल्लेखिलेला शेर मात्रेत चुकलाय खरा.....तो असा लिहिला तर?
सत्ता अधीन होता जो ना दिसे कुणाला
गल्लीतल्या सभेला तो सापडेल आता
मेंदु चा शेर असा वाचावा.
खुंटून जावि प्रज्ञा इतुके न आळ्सावे
बुद्धीस चालना दे मेंदु सडेल आता
गंगाधर राव....प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
डॉ.कैलास
ऋत्विक फाटक
गुरु, 25/03/2010 - 20:29
Permalink
.
.
ऋत्विक फाटक
गुरु, 25/03/2010 - 20:29
Permalink
एक शंका आहे.. जाणकारांनी
एक शंका आहे.. जाणकारांनी कृपया निरसन करावे.
मराठीत 'भरोसा' असा शब्द असतो की 'भरवसा' असा?
या गझलेतच नाही, इतरही अनेक ठिकाणी हा शब्द दोन्ही प्रकारे लिहिलेला वाचला आहे.
चक्रपाणि
गुरु, 25/03/2010 - 21:06
Permalink
ऋत्विक, भरवसा हाच योग्य शब्द
ऋत्विक,
भरवसा हाच योग्य शब्द आहे; भरोसा नाही.
कैलास
शनि, 27/03/2010 - 17:57
Permalink
भाउसाहेब यांची बखर अन
भाउसाहेब यांची बखर अन शिवरायांची जुनी पत्रे व खलिते यात ''भरोसा '' असा उल्लेख आढळतो.मी भरोसा हा शब्द वापरलाय म्हणून त्याचे समर्थन करु इच्छित नाही......पण आज्काल ''भरवसा'' असेच म्हटले जाते....म्हणून भरोसा कदचित खटकत असावा.
डॉ.कैलास
जयश्री अंबासकर
रवि, 28/03/2010 - 14:07
Permalink
छानच !! गल्लीतली सभा, मेंदू
छानच !!
गल्लीतली सभा, मेंदू सडेल आता.......मस्त !!
कैलास
रवि, 28/03/2010 - 15:00
Permalink
धन्यवाद जयश्रीजी...आपल्या
धन्यवाद जयश्रीजी...आपल्या प्रतिसादाने हुरुप आला.
डॉ.कैलास
मधुघट
बुध, 31/03/2010 - 19:24
Permalink
चांगला प्रयत्न आहे
चांगला प्रयत्न आहे कैलास...अभिनंदन!
'भरोसा' हा शब्द मुघलांकडून प्रचारात आला असावा असे वाटते. त्यामुळे त्याचे मूळ अरबी/फारसी रूप तत्कालीन कागदपत्रांत तसेच वापरलेले असावे.....पुढे कालौघात त्याचे 'भरवसा' असे शुद्ध मराठीकरण झाले असावे! मात्रांचा फरक पडत नसल्याने मराठीत शक्यतो 'भरवसा' वापरावा!
कैलास
बुध, 31/03/2010 - 22:21
Permalink
@ मधुघट
@ मधुघट
धन्यवाद.....!!
डॉ.कैलास
केदार पाटणकर
शुक्र, 02/04/2010 - 11:49
Permalink
मेंदू सडेल... वा!चांगला
मेंदू सडेल...
वा!चांगला शेर.
एकंदरीत -हस्व दीर्घाकडे थोडे लक्ष द्यावे.
कैलास
शुक्र, 02/04/2010 - 13:52
Permalink
धन्यवाद
धन्यवाद केदारसाहेब......आरंभशूरतेमुळे कधी र्हस्व माझाच मी दीर्घतो असे झालेय खरे.....पण त्यानंतर ते दोन्ही शेर सुधारण्यात आले आहेत.
डॉ.कैलास
प्रताप
शनि, 03/04/2010 - 08:02
Permalink
आवडली.
आवडली.
कैलास
रवि, 04/04/2010 - 17:10
Permalink
धन्यवाद प्रताप. डॉ.कैलास
धन्यवाद प्रताप.
डॉ.कैलास
चित्तरंजन भट
शुक्र, 09/04/2010 - 10:17
Permalink
खुंटून जाई प्रज्ञा इतुके न
खुंटून जाई प्रज्ञा इतुके न आळ्सावे
बुद्धीस चालना दे मेंदू सडेल आता
ही उपदेशपर द्विपदी छान आहे.
कैलास
गुरु, 06/05/2010 - 19:49
Permalink
धन्यवाद चित्तजी... डॊ.कैलास
धन्यवाद चित्तजी...
डॊ.कैलास