उपाशी

वाशी येथिल एक गझलकार विनायक (अण्णा ) त्रिभुवन यांची मला भावलेली एक रचना .........

तू जरी खाशी तुपाशी
ना इथे मी ही उपाशी

भावनेचा मी भुकेला
भाळलो नाही रुपाशी

जोंधळ्यासाठी उभा मी
काय घेणे त्या सुपाशी?

दंगलो होतो तुझ्याशी
नादलो ना घुंगराशी

या सुगंधी चंदनाने
का जळावे त्या धुपाशी?

का पतंगासारखा मी
झुंज देवू त्या दिपाशी?

जाग येता मी ''विनायक''
आग आगीला तपाशी

--विनायक त्रिभुवन ( अण्णा ) ,वाशी.

संकलन--डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

भावनेचा मी भुकेला
भाळलो नाही रुपाशी

जोंधळ्यासाठी उभा मी
काय घेणे त्या सुपाशी?
या दोन द्विपदी आवडल्या.

धन्यवाद.

अलामत सलामत राहिलेली नाही.

कैलास, तुला ही गझल भावलेली आहे, तेव्हा तू या रचनेचे रसग्रहण करावेस !

आवडली. जोंधळे आवडले.

२,३,५ आवडलेत.

@ज्ञानेश.
गैर मुरद्दफ अशी ही रचना आहे.

डो.कैलास