केवढे चालणे हे मजल दरमजल.....
केवढे चालणे हे मजल दरमजल...
काय जाणे कुणी आखली ही सहल
मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल
काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?
खूप थैमान मी घातले याइथे
सांगण्यासारखी एक नाही गझल
मानवी आज योनी ... उद्या वेगळी
ही रहस्ये उकल ती रहस्ये उकल
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
सागरासारखी लोचने बोलली
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल
गझल:
प्रतिसाद
कैलास
बुध, 24/03/2010 - 09:38
Permalink
विश्व ओलावल्यासारखे
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
क्या बात है!!
रचना आवड्ली
डॉ.कैलास.
ज्ञानेश.
बुध, 24/03/2010 - 11:12
Permalink
छान आहे ही गझल. विश्व
छान आहे ही गझल.
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
सागरासारखी लोचने बोलली
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल
हे दोन शेर आवडले.
'विश्व ओलावल्यासारखे' वरून गुलजारचा हा शेर आठवला-
"जब भी आंखोमे अश्क भर आए,
लोग कुछ डूबते नजर आए.."
वैभव जोशी
बुध, 24/03/2010 - 13:15
Permalink
वा ! संपूर्ण गझल आवडण्याचे
वा ! संपूर्ण गझल आवडण्याचे योग फार कमी वेळा येतात . मग उगाच शिकारी आवडले , भिकारी आवडले असं लिहीत बसावं लागतं . पण ही गझल संपूर्ण आवडली .
अभिनंदन व शुभेच्छा
बेफिकीर
बुध, 24/03/2010 - 19:19
Permalink
कैलास, ज्ञानेश, वैभव मनापासून
कैलास, ज्ञानेश, वैभव
मनापासून आभार!
ज्ञानेश - गुलजार यांचा शेर खूप आवडला. गझल पाठवलीत तर आवडेल.
वैभव - दोन्ही, दोष व चांगल्या गोष्टी तितक्याच स्पष्टपणे व मुद्देसूद सांगतोस हे फार आवडते.
धन्यवाद!
ऋत्विक फाटक
बुध, 24/03/2010 - 20:22
Permalink
विश्व ओलावल्यासारखे
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
वा:!
हा शेर आवडला!
श्यामली
बुध, 24/03/2010 - 23:21
Permalink
मी कितीदातरी ओळ खोडायचो अन
मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल
काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?>>>सुंदर कल्पना आहेत, फार आवडले हे दोन शेर,
अजय अनंत जोशी
बुध, 24/03/2010 - 23:24
Permalink
फारच गम्मतशीर प्रतिसाद
फारच गम्मतशीर प्रतिसाद (योगायोग) आहेत काही..:)
केवढे चालणे हे मजल दरमजल...
काय जाणे कुणी आखली ही सहल
काय जाणे ऐवजी (कोण जाणे) असे नाही का चालणार..?
काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
हे तीन शेर छान. बाकी तुमचे नेहमीचेच वाटले.
चित्तरंजन भट
गुरु, 25/03/2010 - 08:01
Permalink
माझे मत केवढे चालणे हे मजल
माझे मत
केवढे चालणे हे मजल दरमजल...
काय जाणे कुणी आखली ही सहल
खालची ओळ फार सुरेख. 'कोण जाणे' हवे. वरच्या ओळीत फक्त मजल दरमजल चालणे आहे. सहलीची मजा नाही. बहुधा तेच सांगायचे असावे. पण एकंदर छानच.
मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल
उत्तम! वरच्या ओळीत बदलायचो असे वाचले. मग तुझ्यातही तसे बदल व्हायचे असे हवे असे वाटून गेले.
काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?
प्राचीन कल्पना छान मांडली आहे.
खूप थैमान मी घातले या इथे
सांगण्यासारखी एक नाही गझल
हं छान. खालच्या ओळीत प्रश्न हवा असे वाटले.
मानवी आज योनी ... उद्या वेगळी
ही रहस्ये उकल ती रहस्ये उकल
खालची ओळ मस्त.
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
शेर कानांना तर फार छान आहे.
सागरासारखी लोचने बोलली
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल
चांगला !
एकंदर चांगली गझल.
बेफिकीर
गुरु, 25/03/2010 - 10:55
Permalink
ऋत्विक, कामिनी, अजय व
ऋत्विक, कामिनी, अजय व चित्त,
सर्वांचे आभार!
वैभव देशमुख
गुरु, 25/03/2010 - 11:18
Permalink
गझल संपूर्ण आवडली . विश्व
गझल संपूर्ण आवडली .
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
वा ...
खलिश
शुक्र, 26/03/2010 - 22:50
Permalink
व्वाह व्वाह्...बहोत खुब...
व्वाह व्वाह्...बहोत खुब... छान ग़ज़ल.....
`ख़लिश ' / २६-०३-२०१०.
एकटी
शनि, 17/04/2010 - 09:03
Permalink
सागरासारखी लोचने बोलली गाठ
सागरासारखी लोचने बोलली
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल
खाऊन टाकला यार!!!!!!!