घुटमळते मन अधांतरी
घुटमळते मन अधांतरी
अधांतरी घुटमळण्यामध्ये जन्म उरकला सारा
खूप उभारी उडण्याची पण असुया धरतो वारा
पुसतो सदा आसवांना तो पदर भूमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो "आली जाग शिवारा?"
रांजण भरता थकतो खांदा पण तो रिताच उरतो
पाणी मुरते कुठे कळेना, खेळ कसा हा न्यारा ?
मोरपिसाचे रंग लेवुनी, ढगांस तू उधळावे
ढगाळुनी या काळजासही यावा भावपिसारा
शब्दामध्ये परके शब्द बेमालूम ते घुसती
मायबोलीच्या सुंदरतेला काळिमा तो सारा
कालपरत्वे अनहित बुद्धी, तोल तरी ना जावा
मानवतेचा पाठपुरावा ’’अभये" अंगीकारा
गंगाधर मुटे
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
बुध, 17/03/2010 - 23:00
Permalink
रांजण भरता थकतो खांदा पण तो
रांजण भरता थकतो खांदा पण तो रिताच उरतो
पाणी मुरते कुठे कळेना, खेळ कसा हा न्यारा ?
या ओळी आवडल्या. बाकी जरा विचार करावा...
बेफिकीर
गुरु, 18/03/2010 - 10:23
Permalink
दुसरा, तिसरा व चवथा शेर
दुसरा, तिसरा व चवथा शेर आवडले. सुंदर गझल!
कैलास
गुरु, 18/03/2010 - 11:59
Permalink
छान...सुंदर गझल डॉ.कैलास
छान...सुंदर गझल
डॉ.कैलास
ऋत्विक फाटक
गुरु, 18/03/2010 - 20:12
Permalink
रांजण भरता थकतो खांदा पण तो
रांजण भरता थकतो खांदा पण तो रिताच उरतो
पाणी मुरते कुठे कळेना, खेळ कसा हा न्यारा ?
ही द्विपदी आवडली.
तांत्रिकदृष्ट्या जराशी कच्ची वाटली.
कैलास
गुरु, 18/03/2010 - 22:51
Permalink
ऋत्विक फाटक..... गझलेचा
ऋत्विक फाटक.....
गझलेचा महत्वाचा अवयव....म्हणजे '' काफिया''........
त्या अभावे आपणांस ही रचना कच्ची वाटते आहे हे योग्यच आहे.
डॉ.कैलास
प्रताप
शुक्र, 19/03/2010 - 22:42
Permalink
खुप छान. मोरपीस आवडले.
खुप छान. मोरपीस आवडले.
गंगाधर मुटे
शनि, 20/03/2010 - 00:00
Permalink
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
अनिल रत्नाकर
शनि, 20/03/2010 - 00:24
Permalink
अप्रतिम गझल. पुसतो सदा
अप्रतिम गझल.
पुसतो सदा आसवांना तो पदर भूमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो "आली जाग शिवारा?"
पुसतो आणि पुसता ची कमाल आवडली.