रांगले होते

शिकलेल्या मेंदूला बाजारी मांडले होते
परदेशी पैशासाठी ज्ञानी भांडले होते

सुख पाण्या पोराने नातेही लांघले होते
थकलेल्या बापाने जीवाला सांडले होते

गरिबीच्या शापाने दैवाला गांजले होते
भलत्या हावेला स्वार्थाने ओलांडले होते

बघणारे वेडी स्वप्ने सारे आंधळे होते
नसत्या आशेला त्या काळाने कांडले होते

परक्या देशाच्या त्या मीठाने बांधले होते
फसव्या प्रेमाचे ते देखावे मांडले होते

गझल: 

प्रतिसाद

नेहमीप्रमाणेच विषयांचे वैविध्य आवडले. 'होते' ही रदीफ (म्हणजे कोणतीच रदीफ) नसली तर कदाचित जास्तच सुटसुटीत वाटले असते असे माझे मत!

कांडले समजले नाही. शेवटचा शेर फार आवडला. तसेच थकलेल्या बापाचाही!

धन्यवाद!

बेफिकीरजी,
मनःपुर्वक आभार.
मलाही होते खटकत होते.पण नेहमी चुक होते म्हणून होते तसेच ठेवले होते.
पण सुचनेबद्द्ल धन्यवाद.. सुधारणा दिसेल याची खात्री.

फसव्या प्रेमाचे ते देखावे मांडले होते
ही ओळ सुंदर..!
'होते'बद्दल...
प्रत्येक ओळीतील होतेमुळे मजा हरवली आहे असे वाटते.

शिकलेल्या मेंदूला बाजारी मांडले होते
परदेशी पैशासाठी ज्ञानी भांडले होते

परक्या देशाच्या त्या मीठाने बांधले होते
फसव्या प्रेमाचे ते देखावे मांडले होते

हे दोन विशेष आवडले.

अजयजी,
प्रतिसादाबद्द्ल आभार.
नवे वर्ष आपल्याला गझलमय जावो.

गंगाधरजी
आपल्या प्रतिसादांनी नेहमीच बळ वाढते. धन्यवाद.
आपल्यालाही नववर्षाच्या हार्दिक शुभकामना.

एकंदर गझल चांगली झालीये,
'होते' बाबत माझे मत अजयजींप्रमाणेच.

गरिबीच्या शापाने दैवाला गांजले होते
हे नीट कळले नाही... गरीबीचा शाप हा दैवातच असतो ना? आणि कर्मदरिद्रीपणाला शाप म्हणता येणार नाही.

धन्यवाद ऋत्विकजी.
मला दैव हा शव्द नशिब ह्या अर्थाने वापरायचा होता. पण तुमचे म्हणणे पटले. दैवाला गांजले काही बरोबर वाटत नाही.

खुप छान. गरीबी आवडले.

प्रतापजी,
प्रोत्साहनाबद्द्ल धन्यवाद.