देव नव्हता तरी...

देव नव्हता तरी भाकून गेले
स्वार्थ आपापले हाकून गेले

तोतयांची जशी बरसात झाली ...
शब्द माझे मला टाकून गेले

शिंकली ना तशी माशी कुठेही...
दैव कोठेतरी खाकून गेले

आज आपापले हिस्से मिळाले
आज संबंधही फाकून गेले

काय देऊ तुला दर्शन मनाचे !
तेज माझे मला झाकून गेले

जाणले आजही त्यांचे इरादे
जे नको तेवढे वाकून गेले

युद्ध खेळायचे कोणाबरोबर ..?
आपलेही उभे ठाकून गेले..!

गझल: 

प्रतिसाद

काय देऊ तुला दर्शन मनाचे !
तेज माझे मला झाकून गेले

चांगला !

तोतयांची जशी बरसात झाली ...
शब्द माझे मला टाकून गेले

काय देऊ तुला दर्शन मनाचे !
तेज माझे मला झाकून गेले

जाणले आजही त्यांचे इरादे
जे नको तेवढे वाकून गेले

हे तीनही शेर आवडले. धन्यवाद!

मस्त !! झाकून, वाकून ठाकून....... सुरेख !!

युद्ध खेळायचे कोणाबरोबर ..?
आपलेही उभे ठाकून गेले..

क्या बात है...

डॉ.कैलास

युद्ध खेळायचे कोणाबरोबर ..?
आपलेही उभे ठाकून गेले..!

हा जास्त आवडला.
बाकी गझल मस्तच.

उत्कृष्ट झालीये ही गझल!
शिंकली ना तशी माशी कुठेही...
दैव कोठेतरी खाकून गेले

आज आपापले हिस्से मिळाले
आज संबंधही फाकून गेले

काय देऊ तुला दर्शन मनाचे !
तेज माझे मला झाकून गेले

जाणले आजही त्यांचे इरादे
जे नको तेवढे वाकून गेले

युद्ध खेळायचे कोणाबरोबर ..?
आपलेही उभे ठाकून गेले..!
वा: वा:! शेरन् शेर लाजवाब आहे!

शेवटचे तीन शेर विशेष आवडले.

खुप आवडली. दैव, युद्ध आवडले.

मधुर गझल.

काय देऊ तुला दर्शन मनाचे !
तेज माझे मला झाकून गेले

जाणले आजही त्यांचे इरादे
जे नको तेवढे वाकून गेले

युद्ध खेळायचे कोणाबरोबर ..?
आपलेही उभे ठाकून गेले..!

अतिशय सुंदर.

छान ग़ज़ल...
` ख़लिश ' - वि. घारपुरे. २०/०३/२०१०.

प्रतिसाद देणार्‍या - न देणार्‍या सर्वांना धन्यवाद..!

*** "ठाकून"बद्दल....
बेफिकीर आणि माझे एकमेकांच्या गझलांबद्दल बर्‍याचदा बोलणे होते. मी त्यांना गझल ऐकविली तेंव्हा त्यात 'ठाकून' हा काफिया लक्षात आला नव्हता. हा काफियाही घेऊ शकता की असे त्यांनीच सुचविले आणि ठाकूनचा शेर मी लगेचच त्यांना एसएमएस केला. रचलेला हा शेर अनेकांना आवडला. त्याबद्दल बेफिकीर यांचेच आभार मानायला हवेत.