मी क्धी ना अड्वले

घाव ते सारे, मी कधी ना अडवले
भाव ते सारे, मी कधी ना अडवले

मी शिडाची माझ्या, दिशा नीट केली
वाहते वारे, मी कधी ना अडवले

पूल ना भिंती बांधल्या तू कशाला?
माज ते सारे, मी कधी ना अडवले

आवडाया मी लागलो आज तूला
प्रेम ते सारे, मी कधी ना अडवले

शोधण्या मोती, खोलले शिंपले मी
साज ते सारे, मी कधी ना अडवले

गझल: 

प्रतिसाद

मी शिडाची माझ्या, दिशा नीट केली
वाहते वारे, मी कधी ना अडवले

चांगला शेर आहे हा.
शुभेच्छा !

मला पण शिडाचा शेर खूप आवडला.

अनिल,
मतल्यातील काफिया काय आहे?
घाव आणि भाव मध्ये 'आव' येते आहे. माझ्यामते तेच पुढे कायम रहायला हवे. अन्यथा ही तंत्रशुद्ध गझल होणार नाही. आव असे मतल्यात असताना पुढे कुठेही नाही.
घाव ते सारे, मी कधी ना अडवले
भाव ते सारे, मी कधी ना अडवले
व ते सारे, मी कधी ना अडवले = हा अक्षरसमूह तुम्ही कायम ठेवला असताना मागे 'घा' व 'भा' असे आहे. म्हणजे 'आ' अशी अलामत होते आहे.
पुढे तुम्ही वाह(ते), माज, प्रेम, साज असे शब्द वापरले आहेत. त्यात फक्त 'अ' हा स्वर सामायिक आहे. म्हणजे 'अ' हा स्वरकाफिया म्हणून वापरला आहे. 'अ' हा स्वरकाफिया म्हणून असावा का? यावरून पूर्वी गरमा-गरम चर्चा झाल्या आहेत. असो.
तुम्ही नक्की काय काफिया वापरला आहेत हे कळले तर बरे..!
तंत्राच्या बाबतीत निर्णय गझलकाराचा नसावा...:)
बाकी दुसरा शेर छानच.

मला
भाव ते सारे, मी कधी ना अडवले
च्या ऐवजी
भावले सारे, मी कधी ना दडवले

साज ते सारे, मी कधी ना अडवले
च्या ऐवजी
शिल्प ते न्यारे मी कधी ना तुडवले

माज ते सारे, मी कधी ना अडवले
च्या ऐवजी
ऊघडी दारे, मी क्धी ना अडवले

प्रेम ते सारे, मी कधी ना दडवले
च्या ऐवजी
प्रेम ते प्यारे

किंवा अशा अनेक सुधारणा मला करायच्या होत्या. पण तंत्रात न बसल्याने काही निरर्थक मिसरे आले आहेत.
मी आपली माफी मागतो.

मी शिडाची माझ्या, दिशा नीट केली
वाहते वारे, मी कधी ना अडवले

हा ज्ञानेशजी, जयश्रीजींना आवडलेला शेर.(त्याचे आभार)
खरे म्हणजे मला ह्या ओळी सुचल्या, तेंव्हा मी त्या
वाहते वारे, मी कधी ना अडवले
मी शिडाची माझ्या, दिशा नीट केली
अशा लिहील्या होत्या.
आणि अर्थ लगेच कळत होता.

पण नंतर मला नीट, वीट, .... काही जमले नाही. म्हणून ओळी खाली वर करुन गझल पूर्ण केली. मी अजिबात समाधानी नव्हतो. पण तंत्रात बसवताना खुप वेळ गेला. मग वारे, न्यारे, प्यारे, सारे .. हे काफिये घेतले.
आता आपण दाखविलेले काफिये माझ्या मनात नव्हते.( आपण हे बरोबर ओऴखलेत).
आपल्या मार्गदर्शनाबद्द्ल आभार.

तंत्रात मांडताना मला माझ्या कल्पनेशी तडजोड करावी लागते. माझा अभ्यास कमी असेल कदाचित.
शिस्तबध्द आणि सहजसुंदर ह्यात मी जरा घोटाळलो आहे.

मी शिडाची माझ्या, दिशा नीट केली
वाहते वारे, मी कधी ना अडवले

शोधण्या मोती, खोलले शिंपले मी
साज ते सारे, मी कधी ना अडवले

हे विशेष आवडले.