तो बहिर्‍यांची जमवुन मैफल...


तो बहिर्‍यांची जमवुन मैफल, दाद लाटतो आहे
अंधाच्या वस्तीत आरसे व्यर्थ वाटतो आहे

मावळतो ना धर्मच! तेथे मी पहाटतो आहे
कुणास प्रेषित, ख्रिस्त, महंमद, बुध्द वाटतो आहे

बह्मांडाचे बोनसाय मी करीन शंका नाही
नित नेमाने मी नजरेने क्षितिज छाटतो आहे

गावकुसावर बरसलाच ना श्रावण औंदालाही
इथेच येवुन कसा नेमका मेघ आटतो आहे

गरिबांची तर बातच सोडा, महागाईच्या पायी
सुखी माणसाचाही सदरा आज फाटतो आहे

जमीन झाली विकून आता, निविदा काढुन कोणी
गुंठ्यावारी चंद्राचेही बिंब हाटतो आहे

प्रदूषणाने बिघडुन गेले संतुलन विश्वाचे
काल छापुनी आला मथळा "सूर्य बाटतो आहे"

बघू कोणती नवी वेदना वरते आता मजला
स्वतः स्वतःचे खुले स्वयंवर रोज थाटतो आहे

उन्हात बांधिन घर सूर्याचे रातकिडा किरकिरला
नियतीचे प्रारब्ध अतांशी मी ललाटतो आहे

उत्क्रांतीवादाचे चक्रच फिरवुन उलटे पुन्हा
माणसास माकड करण्याचा घाट घाटतो आहे

मी आत्म्याचा पतंग करूनी उंच उडविला गगनी
पाहू आता पेच लढवुनी कोण काटतो आहे?

घनश्याम धेंडे
८/अ, भीमदीप सोसायटी
गोखले नगर, पुणे ४११०१६.

प्रतिसाद

गझल वाचून मन सुन्न झाले.
दाद काय द्यावी? समकालीन सर्वोत्कृष्ट गझल.

तो बहि-यांची जमवुन मैफल, दाद लाटतो आहे
अंधाच्या वस्तीत आरसे व्यर्थ वाटतो आहे
मीटर बद्दल जाणकारांनी मार्गदर्शन करावे....

ह्या मात्रावृत्तात (ह्याला जातिवृत्तही म्हणतात असे वाटते) एकूण २८ मात्रा आहेत असे वाटते.

जेव्हा शनिवारी धेंडेनी गझलकट्टा-२ मधे ही गझल ऐकविली तेव्हा आमचे असेच काही झाले.

जबरदस्त गझल. सगळेच शेर आवडले. त्यातही


बह्मांडाचे बोनसाय मी करीन शंका नाही
नित नेमाने मी नजरेने क्षितिज छाटतो आहे

गावकुसावर बरसलाच ना श्रावण औंदालाही
इथेच येवुन कसा नेमका मेघ आटतो आहे

उत्क्रांतीवादाचे चक्रच फिरवुन उलटे पुन्हा
माणसास माकड करण्याचा घाट घाटतो आहे

हे शेर मला आवडणारे आहेत.


प्रत्येक शेर अगदी आरपार् !
सहजताही जबरी, भाषाही रोकठोक !
अप्रतिम ग़जल !

प्रदूषणाने बिघडुन गेले संतुलन विश्वाचे
काल छापुनी आला मथळा "सूर्य बाटतो आहे"
खरे आहे. हा रोजचाच मथळा आहे. उच्च.

बह्मांडाचे बोनसाय मी करीन शंका नाही
नित नेमाने मी नजरेने क्षितिज छाटतो आहे

बघू कोणती नवी वेदना वरते आता मजला
स्वतः स्वतःचे खुले स्वयंवर रोज थाटतो आहे

उन्हात बांधिन घर सूर्याचे रातकिडा किरकिरला
नियतीचे प्रारब्ध अतांशी मी ललाटतो आहे

उत्क्रांतीवादाचे चक्रच फिरवुन उलटे पुन्हा
माणसास माकड करण्याचा घाट घाटतो आहे

मी आत्म्याचा पतंग करूनी उंच उडविला गगनी
पाहू आता पेच लढवुनी कोण काटतो आहे?
बह्मांडाचे बोन्साय ही कल्पना आवड्ली  
Shailesh 9422870211

गझल व खालील शेर:

बह्मांडाचे बोनसाय मी करीन शंका नाही
नित नेमाने मी नजरेने क्षितिज छाटतो आहे
बघू कोणती नवी वेदना वरते आता मजला
स्वतः स्वतःचे खुले स्वयंवर रोज थाटतो आहे

--- निर्विवादपणे उत्तम!
जयन्ता५२

बह्मांडाचे बोनसाय मी करीन शंका नाही
नित नेमाने मी नजरेने क्षितिज छाटतो आहे.. अतिशय आवडला हा शेर
-मानस६

अप्रतिम!!!

 
 उत्तम!खूपच आवडली.
दाद द्यायचे भानच नाही,निघून गेली,क्या बात है!

काही शब्दलालित्य नजरेआड केले तर बरेचसे शेर चांगले आहेत. रातकिडा आणि  मक्त्याचा शेरखास आवडला.

प्रतिसादाला शब्द नाहीत ..

छान...
गावकुसावर बरसलाच ना श्रावण औंदालाही
इथेच येवुन कसा नेमका मेघ आटतो आहे

गरिबांची तर बातच सोडा, महागाईच्या पायी
सुखी माणसाचाही सदरा आज फाटतो आहे

बह्मांडाचे बोनसाय मी करीन शंका नाही
नित नेमाने मी नजरेने क्षितिज छाटतो आहे

गावकुसावर बरसलाच ना श्रावण औंदालाही
इथेच येवुन कसा नेमका मेघ आटतो आहे

हे शेर खूपच आवडले !!

मस्त! खुप मस्त !!

गावकुसावर बरसलाच ना श्रावण औंदालाही
इथेच येवुन कसा नेमका मेघ आटतो आहे
हा शेर आवडला.

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

गझल उत्तम आहे.
एक त्याच अंदाजा चा शेर आहे. ह्यास ` हिजो ' समजू नये हि विनंती.
" मत पूछो हाल मेरे कारोबार का...
आईने बेच रहा हूं अन्धों के शहर में...."
` खलिश ' - अहमदाबाद. / १७-०६-२००९.
 

विसुनानांप्रमाणेच गझल वाचून सुन्न झालो आहे.

डॉ.कैलास