प्राक्तन फ़िदाच झाले
Posted by गंगाधर मुटे on Monday, 1 March 2010
प्राक्तन फ़िदाच झाले
प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना
हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना
पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळतांना
द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा?
नेमस्त गांजलेले कानून पाळताना
आता "अभय" जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी जगावे ही वाट चालताना
गंगाधर मुटे
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
सोम, 01/03/2010 - 23:06
Permalink
३ रा शेर आवडला.
३ रा शेर आवडला.
गंगाधर मुटे
सोम, 01/03/2010 - 23:59
Permalink
एक उत्सुकता: साधताना,
एक उत्सुकता:
साधताना, गाळताना
ऐवजी
साधतांना, गाळतांना योग्य राहिले असते काय?
प्रताप
मंगळ, 02/03/2010 - 08:01
Permalink
खुप आवडली. वाळू, पिकले फळ
खुप आवडली. वाळू, पिकले फळ आवडले.
कैलास
मंगळ, 02/03/2010 - 09:06
Permalink
छान आहे
छान आहे गंगाधर्पंत....
डॉ.कैलास
बेफिकीर
मंगळ, 02/03/2010 - 14:29
Permalink
गझल आवडली.
गझल आवडली.
अनिल रत्नाकर
मंगळ, 02/03/2010 - 14:52
Permalink
सुंदर गझल.
सुंदर गझल.
ऋत्विक फाटक
मंगळ, 02/03/2010 - 19:07
Permalink
चौथा शेर
चौथा शेर आवडला.
पण....
प्राक्तन आणि फिदा हे शब्द लागोपाठ, द्रवीती आणि कानून हे खटकले.
कदाचित 'तांत्रिकदृष्ट्या' ते शुद्ध असतीलही, पण कविता वाचताना मात्र तिथे अडखळायला होतंय.
गंगाधर मुटे
मंगळ, 05/10/2010 - 08:27
Permalink
सहृदय अभिप्रयाबद्दल सर्वाचा
सहृदय अभिप्रयाबद्दल सर्वाचा आभारी आहे.
फाटकजी आपल्या सुचनेची नोंद घेतली आहे.
वैभव देशमुख
मंगळ, 05/10/2010 - 11:37
Permalink
मोती पुढ्यात आले वाळूस
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना
हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना
शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
वा ... गझल आवडली...
शाम
रवि, 10/10/2010 - 11:32
Permalink
छान ! आवडली पिकल्या फ़ळास
छान ! आवडली
पिकल्या फ़ळास चिंता नसतेच का मुळांची?
दिसले कधीच नाही हितगूज साधताना..
असे केल्यास
मुळी च्या पनरावृत्तीमुळे होणारा संभ्रम ताळता येईल असे वाटते.