खोटे असते हळहळणे
खोटे असते हळहळणे
खरे आतले मळमळणे
कधीच मी सोडून दिले
तुझ्यावाचुनी तळमळणे
सहन कसे मी करू प्रिये..
फुकट कुणाचे सळसळणे ?
मीठ असो किंवा साखर
दुधात असते विरघळणे
बातमी तशी खोटी, पण...
पाहिले तुझे कळवळणे
तारका जिथे चमचमल्या
दिसे तुझेही घुटमळणे
तुझ्याबरोबर फुलूनही..
जमले नाही फळफळणे
जीवन झिजले पदोपदी
उगाच नव्हते भळभळणे
गूण कोणता आवडला ?
उथळपणा? की खळखळणे ?
डंख मार तू एखादा
नको तुझे ते वळवळणे
सोड नुसतेच हिरवळणे
देतो माझे दरवळणे
गझल:
प्रतिसाद
प्रताप
सोम, 22/02/2010 - 07:47
Permalink
खुप आवडली. सगळेच आवडले.
खुप आवडली. सगळेच आवडले. खरे-खोटे, साखर-मीठ, दरवळणे आणखी आवडले.
गंगाधर मुटे
सोम, 22/02/2010 - 08:26
Permalink
डंख मार तू एखादा नको तुझे ते
डंख मार तू एखादा
नको तुझे ते वळवळणे
मस्त. गझल आवडली.
अनिल रत्नाकर
सोम, 22/02/2010 - 08:35
Permalink
दुरवर दरवळणारा छोटा बहर. क्या
दुरवर दरवळणारा छोटा बहर.
क्या बात आहे!!!.
लाघवी गझल.
कैलास
सोम, 22/02/2010 - 09:18
Permalink
गूण कोणता आवडला ? उथळपणा? की
गूण कोणता आवडला ?
उथळपणा? की खळखळणे ?
यतिल गूण खटकला.....
बाकि गझल झकास...
डॉ.कैलास
बेफिकीर
सोम, 22/02/2010 - 09:31
Permalink
संपूर्ण गझल आवडली.
संपूर्ण गझल आवडली. व्वा!
हिरवळणे नीट म्हणता आले नाही.
आनंदयात्री
सोम, 22/02/2010 - 22:23
Permalink
वावा... गूण कोणता आवडला? -
वावा...
गूण कोणता आवडला? - छोटी जमीन...
अजय अनंत जोशी
सोम, 22/02/2010 - 23:16
Permalink
सर्वांस विशेष
सर्वांस विशेष धन्यवाद!
कैलास,
गूण खटकला म्हणजे काय?
कैलास
मंगळ, 23/02/2010 - 09:29
Permalink
गूण.......पहिले अक्षर लघु
गूण.......पहिले अक्षर लघु असावे असे वाटते.
डॉ.कैलास
केदार पाटणकर
मंगळ, 23/02/2010 - 11:03
Permalink
मतला व मीठ, डंख..या दोन
मतला व मीठ, डंख..या दोन द्विपदी आवडल्या.
मीठ असो व साखरही..
असे केले तर?
चित्तरंजन भट
मंगळ, 23/02/2010 - 15:02
Permalink
एकंदर छान आहे गझल.
एकंदर छान आहे गझल.
अजय अनंत जोशी
मंगळ, 23/02/2010 - 22:31
Permalink
केदार, चित्तरंजन
केदार, चित्तरंजन धन्यवाद!
कैलास,
गुण हा शब्द माझ्यामते व्यवहारात शक्यतो र्हस्व उच्चारत नाहीत. र्हस्व-दीर्घ माझ्यामते भावनांप्रमाणे ठरावेत. तसेच आपण व्यवहारात वापरत असतो.
केदार,
मीठ असो व साखरही = हे चालले असते. पण...
१. ते वृत्तात बसणार नाही
२. दुधात एकाचवेळी हे दोन पदार्थ कोणी घालताना मी पाहिले नाहीत.
३. दुधात साखर मिसळणे आणि दुधात मीठ टाकणे हे परस्परविरोधी वाक्प्रयोग आहेत.
४. मला तसे नको होते.
५. असे केले तर? असे आपण विचारले आहेत. तर असे का करावे? हे समजले तर बरे.
चक्रपाणि
बुध, 24/02/2010 - 00:15
Permalink
तळमळणे, घुटमळणे, फळफळणे विशेष
तळमळणे, घुटमळणे, फळफळणे विशेष आवडले.
बेफिकीर
बुध, 24/02/2010 - 19:20
Permalink
स्वसंपादीत
स्वसंपादीत
अजय अनंत जोशी
गुरु, 25/02/2010 - 06:16
Permalink
**** मीठ असो वा साखरही = हे
**** मीठ असो वा साखरही = हे माझ्यामते फारसे योग्य नाही. कारण, शेवटच्या 'ही' चा काय उपयोग? जे म्हणायचे आहे ते 'साखर' म्हटल्यानेच पूर्ण होते आहे. म्हणून किंवा हा पूर्ण शब्द घेतला आहे. 'ही' चा अर्थ 'सुद्धा' असा होतो. म्हणजे, मीठ असो किंवा साखरसुद्धा असो. 'सुद्धा' या शब्दामुळे त्या विधानातील 'खोच' कमी होत आहे आणि मीठ व साखर एकाच पातळीवर येत आहेत. 'ही' साठी 'व' हा शब्द योग्य आहे. म्हणजे, मीठ असो आणि साखरही असो. असे मला वाटले. त्यावर मी लिहिले.
'वा' असे आपण व्यवहारात फारसे वापरत नाही. निदान मी तरी. मी 'किंवा'च वापरतो.
माझे मत :: हे आणि ते सुद्धा हे टाळायचे असल्याने 'किंवा' हे योग्य आहे.
धन्यवाद !
केदार पाटणकर
बुध, 24/02/2010 - 09:23
Permalink
मला मीठ असो वा साखरही असे
मला
मीठ असो वा साखरही
असे लिहायचे होते. चुकून काना दिला गेला नाही.
अजय,
हे प्रवाही आहे, असे मलाही वाटते.
'सुद्धा' या शब्दामुळे त्या विधानातील 'खोच' कमी होत आहे, हे आपले मत माझ्या विचाराधीन आहे.
बेफिकीर
बुध, 24/02/2010 - 19:18
Permalink
स्वसंपादीत
स्वसंपादीत
जयश्री अंबासकर
बुध, 24/02/2010 - 15:50
Permalink
अजय....गझल आवडलीच !! एकदम
अजय....गझल आवडलीच !! एकदम मस्त !!
सुटसुटीत !!
अजय अनंत जोशी
बुध, 24/02/2010 - 22:19
Permalink
केदार, मीठ असो वा साखरही मला
केदार,
मीठ असो वा साखरही
मला हे माझ्या ओळीपेक्षा जास्त प्रवाही वगैरे वाटत नाही. उलट कमकुवतच वाटते. मी जर असे लिहिले असते तर कोणीतरी उठून दुसरे काही म्हणाले असते. अर्थात, मला या फंदात पडायचे नाही. कारण, कोण काय म्हणते यावर माझी गझल अवलंबून नाही. अर्थातच, तुमचीही नसेल.
तुम्ही सुचविलेत ते ठीक. तुलना वगैरे करू नका.
अजय अनंत जोशी
बुध, 24/02/2010 - 22:21
Permalink
जयश्रीताई, धन्यवाद. सुटसुटीत
जयश्रीताई,
धन्यवाद. सुटसुटीत हा शब्द मला भयंकर आवडला.