व्यथा
व्यथा
जितके जमेल तितके अडवीन मी व्यथांना
नाहीच ऐकले तर बडवीन मी व्यथांना
केला प्रयास जर का त्यांनी लढावयचा...
नक्की क्षणाक्षणाला रडवीन मी व्यथांना
त्यांना हिर्यांप्रमाणे समजेन यापुढे मी
नशिबासवेच माझ्या घडवीन मी व्यथांना
एकेक अपयशाला हटवीन पार मागे...
अन् ठोकरीत एका उडवीन मी व्यथांना
कणखरपणास माझ्या जाऊ नये तडा; पण-
गेल्यास, लोचनी या दडवीन मी व्यथांना
....... आरती कदम
गझल:
प्रतिसाद
कैलास
बुध, 17/02/2010 - 18:48
Permalink
सुंदर...... प्रत्येक शेर
सुंदर......
प्रत्येक शेर आवडला.
डॉ.कैलास
बेफिकीर
बुध, 17/02/2010 - 20:01
Permalink
गेल्यास, लोचनी या दडवीन मी
गेल्यास, लोचनी या दडवीन मी व्यथांना!
छान गझल!
दशरथयादव
गुरु, 18/02/2010 - 14:39
Permalink
आरती.... गझल भन्नाट आहे...
आरती....
गझल भन्नाट आहे...
प्रताप
शुक्र, 19/02/2010 - 07:55
Permalink
खुप छान. उडवीन व्यथाना
खुप छान. उडवीन व्यथाना आवडले.
अजय अनंत जोशी
शुक्र, 19/02/2010 - 21:43
Permalink
नाहीच ऐकले तर बडवीन मी
नाहीच ऐकले तर बडवीन मी व्यथांना .... हा हा हा
फार रागावू नका हो !
[व्यथा आहेत म्हणून तर गझल आहे ना?]
आनंदयात्री
शनि, 20/02/2010 - 22:31
Permalink
कणखरपणास माझ्या जाऊ नये तडा;
कणखरपणास माझ्या जाऊ नये तडा; पण-
गेल्यास, लोचनी या दडवीन मी व्यथांना
वा...
चित्तरंजन भट
मंगळ, 23/02/2010 - 19:26
Permalink
छान. व्यथांना बडवणे अभिनव :)
छान. व्यथांना बडवणे अभिनव :)