आता

तारण्याला पाहिजे तो राम आता
आड डोळ्यांच्या निजे तो काम आता

ऊघड्याने बागडे ती लाज आता
लाजताना दाविजे तो काम आता?

वास घामाचा नसे पैशास आता
साठल्याने ना कुजे तो दाम आता

या मदांधाचेच खोटे राज्य आता
रोज पापाने भिजे तो साम आता

देह झाला राक्षसांचे धाम आता
ह्या भयानेची थिजे तो शाम आता

गझल: 

प्रतिसाद

तारण्याला पाहिजे तो राम आता
आड डोळ्यांच्या निजे तो काम आता

ऊघड्याने बागडे ती लाज आता
मार्दवामागे सजे तो काम आता?

वास घामाचा नसे पैशास आता
साठल्याने ना कुजे तो दाम आता

या मदांधाचेच खोटे राज्य आता
रोज पापाने भिजे तो साम आता

देह झाला राक्षसांचे धाम आता
ह्या भयानेची थिजे तो शाम आता

खुप छान. वास घामाचा,राक्षस आवडले.

फारच सुंदर गझल.

देह झाला राक्षसांचे धाम आता
ही ओळ छान. बाकी जरा विचार करा.

प्रतापजी, गंगाधरजी धन्यवाद.
अजयजी, धन्यवाद. विचारच करत होतो अजुन वजन कसे आणता येईल याचा.
सुरेश भटांनीही 'आता' रदीफ' घेऊन लिहील्याचे नुकतेच 'झंझावात" मध्ये वाचले.मला कॉपी करायची नव्ह्ती पण अनवधानाने झाली.
चांगल्या कल्पना अयोग्य तंत्राने वाया जात आहेत याची मला जाणीव झाली आहे.
आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार.

अनिलजी,
चांगल्या कल्पना अयोग्य तंत्राने वाया जात आहेत याची मला जाणीव झाली आहे.
असे म्हणू नका.
चांगल्या कल्पना कधीच वाया जात नाहीत. क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाज एखाद्या चेंडूवर फलंदाजाला त्रिफळाचित करतो आणि तो नेमका नो-बॉल असतो. तेंव्हा तो फलंदाज बाद होत नाही हे सोडून द्या पण गोलंदाजाची गुणवत्ता नक्कीच त्या त्रिफळाचितमुळे कळते.
असेच काही वेळा सर्वांचेच होते. काहीवेळा चांगल्या कल्पना भाव खाऊन जात नाहीत. परंतु, त्यात गुणवत्ता नसणे हा एकच भाग असतो असे नाही बरं!..:) असो.
याच कल्पना कदाचित पुढे तुम्हाला वेगळ्या बहरात सुचून काही चांगले तयार होवू शकेल. तुम्ही जर नुकतीच सुरूवात केली असेल तर जे लिहिता ते चांगलेच आहे असे मला वाटते.
वास घामाचा वगैरे कल्पना फार छान.
मार्दवामागे सजे तो काम आता .. ही कल्पना छान. पण पहिल्या ओळीत ऊ मुळे गडबड आहे.
असो..
प्रयत्ने शेर रचता गझलही घडे..