तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी अंतर कधी लाटा
तुझ्या माझ्या म्हणे झाल्या कधी गप्पा जिव्हाळ्याच्या
कुठे ती ऊब गेली.. का असा केलास बोभाटा?
फुलांना त्रास मी नाही दिला ना बोललो काही
कशाचा दंश झाला मज? ...कुणी हा टोचला काटा..
जरा ऐकून तर घे ना म्हणे म्हणणे कुणाचे तू....
(तसे केले कधी मी तर कुणी फोडायचा फाटा?
इथूनच बघ उद्या होतील अपुल्या वेगळ्या वाटा
दिवस लक्षात्,तू स्मरणात ,आठवणीत हा फाटा
मिषाने या उधाणाच्या किती झाडे बहकलेली .........
उडाला ठिकठिकाणी दूर पाचोळाच उफराटा!
गझल:
प्रतिसाद
अनिल रत्नाकर
मंगळ, 16/02/2010 - 08:31
Permalink
फारच सुंदर, तुला बोलावतो सागर
फारच सुंदर,
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी अंतर कधी लाटा
(क्या बात है!)३
इथूनच बघ उद्या होतील अपुल्या वेगळ्या वाटा
दिवस लक्षात्,तू स्मरणात ,आठवणीत हा फाटा
दशरथयादव
मंगळ, 16/02/2010 - 15:13
Permalink
छान.. तुला बोलावतो सागर तुला
छान..
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी अंतर कधी लाटा
गंगाधर मुटे
मंगळ, 16/02/2010 - 19:23
Permalink
तुला बोलावतो सागर तुला
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी अंतर कधी लाटा
छान . आवडली गझल..!!
अजय अनंत जोशी
मंगळ, 16/02/2010 - 22:24
Permalink
तुला बोलावतो सागर तुला
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी अंतर कधी लाटा
फारच छान!
बेफिकीर
बुध, 17/02/2010 - 13:27
Permalink
गझल आवडली. लाटा व उरफाटा हे
गझल आवडली. लाटा व उरफाटा हे शेर जास्त आवडले.
धन्यवाद!
प्रसाद लिमये
बुध, 17/02/2010 - 15:34
Permalink
सुंदर मतला, बोभाटा व शेवटचा
सुंदर
मतला, बोभाटा व शेवटचा शेर खूपच सुरेख आहेत
प्रताप
शुक्र, 19/02/2010 - 08:03
Permalink
खुप छान. पाचोळा आवडले.
खुप छान. पाचोळा आवडले.
ह बा
गुरु, 27/05/2010 - 19:05
Permalink
मिषाने या उधाणाच्या किती झाडे
मिषाने या उधाणाच्या किती झाडे बहकलेली .........
उडाला ठिकठिकाणी दूर पाचोळाच उफराटा
अप्रतिम शेर!!!