नको आणखी
फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी
घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी
गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
नजरेत जरबी कट्यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी
धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी
जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
जयश्री
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
मंगळ, 09/02/2010 - 22:17
Permalink
जगतोच आहे तुझ्याही विना आधार
जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
वा! छान.
मतलाही छान.
बेफिकीर
बुध, 10/02/2010 - 08:07
Permalink
आधार फसवे नको आणखी - हाच शेर
आधार फसवे नको आणखी -
हाच शेर आवडला. गझलही सुटसुटीत व चांगली वाटली.
धन्यवाद!
दशरथयादव
बुध, 10/02/2010 - 11:48
Permalink
भन्नाट फुलणे नव्याने नको
भन्नाट
फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी
घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी
गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
चित्तरंजन भट
गुरु, 11/02/2010 - 00:34
Permalink
फुलणे नव्याने नको आणखी उमलून
फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी
जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
ह्या द्विपदी छान झाल्या आहेत. बाकी इष्कात झुरणे, निशिगंध चाफे वगैरे टाळून बघा पुढच्या वेळेस.
बेफिकीर
गुरु, 11/02/2010 - 00:53
Permalink
'टाळून बघा पुढच्या वेळेस' -
'टाळून बघा पुढच्या वेळेस' - हा हा हा हा! जबरी मतप्रदर्शन!
:-))
जयश्री अंबासकर
गुरु, 11/02/2010 - 09:59
Permalink
चित्त...... आपका कहना सर
चित्त...... आपका कहना सर आखोंपे :)
तोच तो पणा होतोय ना सारखा ....!! नक्की प्रयत्न करेन. तुमच्या परखड सूचनांचा मी नेहेमीच आदर करते. असंच लक्ष असू द्या :)
अजय, बेफिकीर, दशरथ, धन्यवाद !!
प्रताप
रवि, 14/02/2010 - 08:17
Permalink
खुप आवडली. इश्कात झुरणे,
खुप आवडली. इश्कात झुरणे, गंधात न्हालो, पेटून विझणे आवडले.
केदार पाटणकर
मंगळ, 16/02/2010 - 09:35
Permalink
येणे तुझे क्षणभराचेच का पेटून
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
हा आवडला.
...वाहवा!
गंगाधर मुटे
मंगळ, 16/02/2010 - 19:24
Permalink
पुर्ण गझल आवडली.
पुर्ण गझल आवडली.
प्रसाद लिमये
बुध, 17/02/2010 - 15:42
Permalink
जगतोच आहे तुझ्याही विना आधार
जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
सुंदर
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
छानच
जयश्री अंबासकर
रवि, 21/02/2010 - 12:56
Permalink
प्रताप, केदार, गंगाधर, प्रसाद
प्रताप, केदार, गंगाधर, प्रसाद ..तहे दिल से शुक्रिया !