खेळणे

येउनी स्वप्नात गप्पा मारते कोणीतरी
एरवी जागा अबोला पाळते कोणीतरी

खेळणे करुनी मनाचे खेळते कोणीतरी
आपले कोणीतरी मग वाटते कोणीतरी

हालला वार्‍यामुळे पडदा तुझ्या खिडकीतला
घेतले वाटून मी की पाहते कोणीतरी

मी प्रवासाला निघालो, बोललो नाही कुठे
नीट जा सांगायलाही लागते कोणीतरी

वेगळी अपुली घरे पण साम्य दोन्हीतील हे
झोपती सारे इतर, पण जागते कोणीतरी

एक नावाच्याचपुरता 'बेफिकिर' आहेस तू
बघ तुझ्या नावाप्रमाणे वागते कोणीतरी

गझल: 

प्रतिसाद

हालला वार्‍यामुळे पडदा तुझ्या खिडकीतला
घेतले वाटून मी की पाहते कोणीतरी

एक नावाच्याचपुरता 'बेफिकिर' आहेस तू
बघ तुझ्या नावाप्रमाणे वागते कोणीतरी

अप्रतिम!!!!

डॉ.कैलास गायकवाड

हालला वार्‍यामुळे पडदा तुझ्या खिडकीतला
घेतले वाटून मी की पाहते कोणीतरी

मी प्रवासाला निघालो, बोललो नाही कुठे
नीट जा सांगायलाही लागते कोणीतरी

वेगळी अपुली घरे पण साम्य दोन्हीतील हे
झोपती सारे इतर, पण जागते कोणीतरी

बेफिकीरराव,
हे तीनही जबराट. योगायोग असा की, आपल्याला जे वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे करायचे आहे तेच मलाही काही दिवसांपासून उभे करायचे होते. नेमके असेच शेर लिहायचे होते. हीच दृष्ये डोळ्यांसमोर होती.
आपण लिहिलेत. समाधान झाले.

खूपच आवडली गझल !

पडदा, प्रवास, मक्ता.....एकदम सही !!

फक्त मतला काही खास वाटला नाही :(

खेळणे करुनी मनाचे खेळते कोणीतरी
आपले कोणीतरी मग वाटते कोणीतरी

हालला वार्‍यामुळे पडदा तुझ्या खिडकीतला
घेतले वाटून मी की पाहते कोणीतरी
हे जास्त भावले.

खेळणे करुनी मनाचे खेळते कोणीतरी
आपले कोणीतरी मग वाटते कोणीतरी

हालला वार्‍यामुळे पडदा तुझ्या खिडकीतला
घेतले वाटून मी की पाहते कोणीतरी

हे दोनही शेर फार छान!

सर्वांचे मनापासून आभार!

केदार - आभार! आपला संचारध्वनी क्रमांक बदलला असावा. कृपया नव्या क्रमांकवरून मला ९३७१०८०३८७ वर कॉल करावे.
आपल्याही गझल्च्या प्रतीक्षेत!

जयश्री - स्पष्ट प्रतिसादाबद्दल आभार! मीही पुन्हा मतला तपासून बघतो.

हालला वार्‍यामुळे पडदा तुझ्या खिडकीतला
घेतले वाटून मी की पाहते कोणीतरी

मी प्रवासाला निघालो, बोललो नाही कुठे
नीट जा सांगायलाही लागते कोणीतरी

वा वा, झकास

क्या बात हॅ,मजा आ गया

छान्..बरका

हालला वार्‍यामुळे पडदा तुझ्या खिडकीतला
घेतले वाटून मी की पाहते कोणीतरी

मी प्रवासाला निघालो, बोललो नाही कुठे
नीट जा सांगायलाही लागते कोणीतरी

वेगळी अपुली घरे पण साम्य दोन्हीतील हे
झोपती सारे इतर, पण जागते कोणीतरी

खुप छान. हलला पडदा आवडले.

पडदा आवडला. छान.

प्रसाद, दशरथ, प्रताप व चित्त,

मनापासून धन्यवाद!

(ही एक गझल 'माझ्या आयुष्यातून जशी आहे तशी' आलेली आहे.)

यासाठी सर्वांचे खास धन्यवाद!