पतंग
पुन्हा अता मी झुरतो आहे
कणाकणाने सरतो आहे
नशीब मोठे दर्पणाचे त्या
बघून ते मी जळतो आहे
तुला कसे मी समजावू गं?
तुलाच आता पुसतो आहे
मनास का आज भिती वाटे
तुझा खुलासा कळतो आहे
..नि प्राण घेऊन पतंगाचा
दिवा 'बिचारा' जळतो आहे!
गझल:
आडवी एक तिथे भिंत मनाची आली..
दार होतेच कुठे आत शिरायासाठी ?
पुन्हा अता मी झुरतो आहे
कणाकणाने सरतो आहे
नशीब मोठे दर्पणाचे त्या
बघून ते मी जळतो आहे
तुला कसे मी समजावू गं?
तुलाच आता पुसतो आहे
मनास का आज भिती वाटे
तुझा खुलासा कळतो आहे
..नि प्राण घेऊन पतंगाचा
दिवा 'बिचारा' जळतो आहे!
प्रतिसाद
नितीन
मंगळ, 29/05/2007 - 16:53
Permalink
Where are the wise men??? :-)
आपल्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत....
-नितीन
चित्तरंजन भट
बुध, 30/05/2007 - 11:01
Permalink
माझे मत
तंत्र आणि नियमांची पूर्तता केली म्हणजे शेर शेर होत नसतो. मक्ता छानआहे पण गझल एकंदर बरीच वृत्तांतात्मक आणि वरवरची झाली आहे, असे मला वाटते.
तसेच 'झुरतो' आणि 'सरतो' मतल्यात आहे.त्यामुळे खालच्या द्विपदींत 'मरतो', 'ठरतो', 'उरतो' असे काफिये अपेक्षित होते.
समीर चव्हाण (not verified)
बुध, 30/05/2007 - 12:13
Permalink
घाई करू नये
पुन्हा एकदा चित्तरंजन यांच्याशी सहमत.
नितीन
गझल पोस्ट करण्याची घाई करू नये.