देवास ज्ञात आहे (अल्लाह जानता है)

सारे भले-बुरे ते देवास ज्ञात आहे
वसते मनात जे ते देवास ज्ञात आहे

जाऊन जेथ कोणी, परतून येत नाही
स्थळ कोणते असे ते, देवास ज्ञात आहे

लपवून ठेविशी का तू पाप-पुण्य अपुले?
जे ज्ञात व्हायचे ते देवास ज्ञात आहे!

फिरते उषे-निशेचे अन् ऊन-सावल्यांचे
हे चक्र कोणते ते देवास ज्ञात आहे

सर्वांस दैव परिचित असते, खरेच हे पण-
विधिलिखित जे खरे ते देवास ज्ञात आहे!

- कुमार जावडेकर

मूळ गझल (फैज अहमद फैज यांची, जगजीतसिंग यांनी स्वरबद्ध केलेली आणि जगजीतसिंग व लता मंगेशकर यांनी गायलेली)

जो भी बुरा-भला है अल्लाह जानता है
बंदे के दिल में क्या है अल्लाह जानता है

जाकर जहां पे कोई वापस नहीं है आता
वो कौनसी जगा है अल्लाह जानता है

नेकी बदी को अपने कितना ही तू छुपा ले
अल्लाह को पता है अल्लाह जानता है

ये धूप-छाव देखो, ये सुबह शाम देखो
ये जो भी हो राहा है अल्लाह जानता है

किस्मत के नाम को तो सब जानते है लेकिन
किस्मत में क्या लिखा है अल्लाह जानता है

गझल: 

प्रतिसाद

दोन्ही गझल्स आवडल्या.

अगदी चपखल मराठीकरण झालेले आहे........शब्द्,आशय्,लय......सर्वच.
खूप छान...

डॉ.कैलास गायकवाड

छान झालाय अनुवाद.
नुसती मराठी गझल वाचली तरीही चांगली वाटतेय!

फिरते उषे-निशेचे अन् ऊन-सावल्यांचे
हे चक्र कोणते ते देवास ज्ञात आहे

ये जो भी हो राहा है अल्लाह जानता है
याला जरा अजून समर्पक ओळ सुचली तर बघा!

खरंच नुसती मराठी गझल वाचली तरी ती स्वतंत्र रचना वाटली आणि आवडली. सगळ्याच द्विपदी मस्त जमल्या आहेत.
अनुवाद म्हणूनही उत्तम!

क्रान्ती यांच्याशी सहमत! स्वतंत्र गझल वाटू शकत आहे.

मात्र, मूळ गझल काही विशेष वाटत नाही (आशयाच्या दृष्टीने - अर्थात, वैयक्तीक मत) त्यामुळे अनुवादही साधारण वाटत आहे.

मात्र, कुमार,

आपण अनुवाद अलमोस्ट परफेक्टही केला आहेत व आपल्या स्वतःच्या काही गझला फैजच्या 'या' गझलेहून चांगल्या आहेत हे मला व सगळ्यांना माहीत आहेच.

चु.भु.द्या.घ्या.

वा कुमारराव! अनुवाद, तोही समछंदी, चांगला झाला आहे. आणखी येऊ द्या.

मूळ गझलेबरोबर अनुवाद आवडला...!

और भी आने दो....!

-दिलीप बिरुटे

अप्रतिम ग़झल.
अनुवाद भन्नाट.
आपली गझलतंत्रावरील हुकूमत जाणवते.
मराठी भाषेची नजाकत मुळ गझलेपेक्षा जास्त भावते.

देव आहे पण कुठे?
दासूजी वैद्य शेतक-याची व्यथा मांडताना म्हणतात ,'वारी निघाली पंढरपुराला, पण येथे शेतात पांडुरंग मरून पडला आहे'.
आणि मी,
असे कोणते मंदिर जेथे देवास जात नाही.

क्रांती,बेफिकिर यांचेशी सहमत.

काही संदर्भ घेतल्यानंतर समजले की:

ही गझल अख्तर शीरानी यांची आहे. फैज अहमद फैज यांची नाही.

(मुहम्मद दावूद खान असे त्यांचे नाव असावे असे दिसते.'अख्तर यांचे')

धन्यवाद!

बेफिकीर,

आंतरजालावर शोधलं असता फैजची आहे असं कळलं होतं. (ओळखीच्या एका उर्दू शायरांकडूनही खातरजमा करून घेतली होती. ) पण असं असल्यास कृपया क्षमस्व.

- कुमार