घराणी
सांगू नको रे माणसा अपुली घराणी
जाते पुन्हा ती माकडांपाशी कहाणी!
ऐशी न पूर्वी पाहिली मी जात होती
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!
गर्दीत होतो गाढवांच्या बैसलेला
माणूस होतो पण तरी ठरलो अडाणी!
आता ढगांचा राहिला कोठे भरोसा
या पावसाने आणले डोळ्यांत पाणी!
मी वास्तवाशी झुंजण्या गेलोच नाही
अमुच्याकडे खोट्या कथा, खोटीच गाणी!
गझल:
प्रतिसाद
ऋत्विक फाटक
मंगळ, 09/02/2010 - 19:24
Permalink
अजून एक शेर...पण रदीफ जरा
अजून एक शेर...पण रदीफ जरा वेगळी आहे..
या आमच्या गावात नाहित आडवाटा
सा-याच जाती थेट घेऊनी स्मशानी!
अजय अनंत जोशी
मंगळ, 09/02/2010 - 22:19
Permalink
गर्दीत होतो गाढवांच्या
गर्दीत होतो गाढवांच्या बैसलेला
माणूस होतो पण तरी ठरलो अडाणी!
व्वा! सुरेख!
आता ढगांचा राहिला कोठे भरोसा
या पावसाने आणले डोळ्यांत पाणी!
छान.
क्रान्ति
मंगळ, 09/02/2010 - 22:40
Permalink
ऐशी न पूर्वी पाहिली मी जात
ऐशी न पूर्वी पाहिली मी जात होती
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!
मी वास्तवाशी झुंजण्या गेलोच नाही
अमुच्याकडे खोट्या कथा, खोटीच गाणी!
वा! खास! गझल आवडली.
ज्ञानेश.
बुध, 10/02/2010 - 00:00
Permalink
ऐशी न पूर्वी पाहिली मी जात
ऐशी न पूर्वी पाहिली मी जात होती
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!
अतिशय उत्तम शेर आहे. 'अडाणी' सुद्धा छान.
'घराणी' अनेकवचनात असल्याने जरा खटकते.
बेफिकीर
बुध, 10/02/2010 - 08:06
Permalink
आता ढगांचा राहिला कोठे
आता ढगांचा राहिला कोठे भरोसा
या पावसाने आणले डोळ्यांत पाणी!
मी वास्तवाशी झुंजण्या गेलोच नाही
अमुच्याकडे खोट्या कथा, खोटीच गाणी!
हे शेर आवडले तर
सहाणी
अन
अडाणी
हे जास्त आवडले.
धन्यवाद!
जयश्री अंबासकर
बुध, 10/02/2010 - 11:58
Permalink
अडाणी, ढग, खोटी कहाणी खूप
अडाणी, ढग, खोटी कहाणी खूप आवडले !
मस्तच आहे गझल !
चित्तरंजन भट
बुध, 10/02/2010 - 22:45
Permalink
एकंदर छान. शक्य असल्यास 'ऐशी
एकंदर छान. शक्य असल्यास 'ऐशी तैशी' करू नये.
ऐशी न पूर्वी पाहिली मी जात होती
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!
अमुच्याकडे खोट्या कथा, खोटीच गाणी!
चांगली द्विपदी व ओळ.
अनिल रत्नाकर
बुध, 10/02/2010 - 23:07
Permalink
या चंदनाने शेवटी झिजल्या
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!
अप्रतिम.
गर्दीत होतो गाढवांच्या बैसलेला
माणूस होतो पण तरी ठरलो अडाणी!
गाढवांच्या गर्दीत बसलेला माणूस, आपल्याला कोणीतरी शहाणे म्हणावे अशी अपेक्षा कशी करेल?
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला कळले आहे पण उगाच..
लोभ असावा.
दशरथयादव
गुरु, 11/02/2010 - 13:34
Permalink
छान.. सांगू नको रे माणसा
छान..
सांगू नको रे माणसा अपुली घराणी
जाते पुन्हा ती माकडांपाशी कहाणी!
ऐशी न पूर्वी पाहिली मी जात होती
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!
प्रताप
रवि, 14/02/2010 - 08:11
Permalink
खुप छान. डोळ्यात पाणी आवडले.
खुप छान. डोळ्यात पाणी आवडले.
ऋत्विक फाटक
रवि, 14/02/2010 - 19:05
Permalink
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
ह बा
गुरु, 27/05/2010 - 19:14
Permalink
गर्दीत होतो गाढवांच्या
गर्दीत होतो गाढवांच्या बैसलेला
माणूस होतो पण तरी ठरलो अडाणी!
अल्टी!!!