पक्षी
वाटायचे उडणार नाही पण उडाला शेवटी
हा पिंजरा जाळून पक्षी मुक्त झाला शेवटी
मी उत्तरे देऊनही शकलेच झाली शेकडो
वेताळ आयुष्या तुझा खोटा निघाला शेवटी
आल्या क्षणापासून मी रमलो मरेपर्यंत पण
कळलेच नाही मी इथे होतो कशाला शेवटी?
दिसताच तू मी खिन्न होतो हे जरा विसरून जा
वाटायचे ते वाटते ना माणसाला शेवटी?
सांगू नको म्हणतेस तू हेही खरे आहे म्हणा
पण सांग ना सांगायचे मीही कुणाला शेवटी?
असतो सकाळी एक मी, असतो दुपारी वेगळा
भलताच कोणी टेकतो डोके उशाला शेवटी
अगदी खुली नसली तरी वेणी तुझी सुटली जरा
काही म्हणा मुद्दा तुझ्या लक्षात आला शेवटी
'मी चांगला नाही' कुणी म्हणणार नाही वाटले
हाही म्हणाला शेवटी, तोही म्हणाला शेवटी
सुरुवात आहे तोवरी पाणी वगैरे चालुदे
मी 'बेफिकिर' होईन मग नुसतीच घाला शेवटी
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
मंगळ, 09/02/2010 - 22:22
Permalink
दिसताच तू मी खिन्न होतो हे
दिसताच तू मी खिन्न होतो हे जरा विसरून जा
वाटायचे ते वाटते ना माणसाला शेवटी?
असतो सकाळी एक मी, असतो दुपारी वेगळा
भलताच कोणी टेकतो डोके उशाला शेवटी
अगदी खुली नसली तरी वेणी तुझी सुटली जरा
काही म्हणा मुद्दा तुझ्या लक्षात आला शेवटी
हे तीनही शेर आवडले.
सुरुवात आहे तोवरी पाणी वगैरे चालुदे
मी 'बेफिकिर' होईन मग नुसतीच घाला शेवटी
हे नाही समजले.
ज्ञानेश.
बुध, 10/02/2010 - 00:06
Permalink
वा. सर्व शेर मस्त आहेत. गझल
वा.
सर्व शेर मस्त आहेत.
गझल आवडली.
आल्या क्षणापासून मी रमलो मरेपर्यंत पण
कळलेच नाही मी इथे होतो कशाला शेवटी?
असतो सकाळी एक मी, असतो दुपारी वेगळा
भलताच कोणी टेकतो डोके उशाला शेवटी
व्वा..! अप्रतिम.
श्रीवत्स
बुध, 10/02/2010 - 19:06
Permalink
चांगली गझल.... पाणी शेर -
चांगली गझल....
पाणी शेर - अगम्य.
ऋत्विक फाटक
बुध, 10/02/2010 - 19:42
Permalink
मी उत्तरे देऊनही शकलेच झाली
मी उत्तरे देऊनही शकलेच झाली शेकडो
वेताळ आयुष्या तुझा खोटा निघाला शेवटी
आल्या क्षणापासून मी रमलो मरेपर्यंत पण
कळलेच नाही मी इथे होतो कशाला शेवटी?
दिसताच तू मी खिन्न होतो हे जरा विसरून जा
वाटायचे ते वाटते ना माणसाला शेवटी?
सांगू नको म्हणतेस तू हेही खरे आहे म्हणा
पण सांग ना सांगायचे मीही कुणाला शेवटी?
असतो सकाळी एक मी, असतो दुपारी वेगळा
भलताच कोणी टेकतो डोके उशाला शेवटी
अगदी खुली नसली तरी वेणी तुझी सुटली जरा
काही म्हणा मुद्दा तुझ्या लक्षात आला शेवटी
वा: हे सगळे शेर खूप बोलके आणि सहज झालेत.
मतला जरासा सरळसोट वाटला...
मक्ता मात्र समजला नाही!
चित्तरंजन भट
बुध, 10/02/2010 - 22:07
Permalink
३ ते ८ शेर चांगले आहेत.
३ ते ८ शेर चांगले आहेत.
क्रान्ति
बुध, 10/02/2010 - 23:12
Permalink
दिसताच तू मी खिन्न होतो हे
दिसताच तू मी खिन्न होतो हे जरा विसरून जा
वाटायचे ते वाटते ना माणसाला शेवटी?
'मी चांगला नाही' कुणी म्हणणार नाही वाटले
हाही म्हणाला शेवटी, तोही म्हणाला शेवटी
सही!
अनिल रत्नाकर
गुरु, 11/02/2010 - 14:23
Permalink
अप्रतिम गजल. तंत्रशुध्द आणि
अप्रतिम गजल.
तंत्रशुध्द आणि ओघवती.
वाटायचे उडणार नाही पण उडाला शेवटी
हा पिंजरा जाळून पक्षी मुक्त झाला शेवटी
प्राणपक्षाबद्द्लच म्हणताय ना. अप्रतिम.
यावरुन आठवल्या, माझ्या एक कवितेतील ओळी,
पण खरेच देह मुक्त होत असेल का हो?
पक्षीदेखील आपल्या रंगाचीच पिसे शोधतात
धडकेने देह उंच उडाला
खाली पडला तेंव्हा प्राणपक्षी उडून गेला
नव्या दुनियेत
चिंध्या झालेल्या देहाभोवती
पिसांचा रंग शोधती
जाळावे की पुरावे ह्या देहाला
अद्याप ना निर्णय घेती.
लोभ असावा.
बेफिकीर
शुक्र, 12/02/2010 - 17:59
Permalink
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून धन्यवाद!
अजय, श्रीवत्स, ऋत्विक,
मक्ता दारूबाबत आहे.
धन्यवाद!
काव्यरसिक
शुक्र, 12/02/2010 - 19:44
Permalink
खूप छान! बरेच शेर ओघवते आहेत
खूप छान!
बरेच शेर ओघवते आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनाला भिडणारे आहेत.
मला खालील शेर अधिक आवडले,
वाटायचे उडणार नाही पण उडाला शेवटी
हा पिंजरा जाळून पक्षी मुक्त झाला शेवटी
असतो सकाळी एक मी, असतो दुपारी वेगळा
भलताच कोणी टेकतो डोके उशाला शेवटी
'मी चांगला नाही' कुणी म्हणणार नाही वाटले
हाही म्हणाला शेवटी, तोही म्हणाला शेवटी
(आहाहा! माणसाची आयुष्याकडून दुसरी काय अपेक्षा असू शकते?)
धन्यवाद!
----------------------------------नचिकेत भिंगार्डे.
प्रताप
रवि, 14/02/2010 - 08:10
Permalink
खुप आवडली. वेणी छान.
खुप आवडली. वेणी छान.
बेफिकीर
बुध, 17/02/2010 - 13:30
Permalink
काव्यरसिक व प्रताप, आभारी
काव्यरसिक व प्रताप,
आभारी आहे.
प्रसाद लिमये
बुध, 17/02/2010 - 15:38
Permalink
भूषण, ... मस्त रमलो, डोके
भूषण, ... मस्त
रमलो, डोके उशाला व वेणी हे विशेष आवडले
आनंदयात्री
शनि, 20/02/2010 - 22:34
Permalink
डोके, वेणी हे शेर आवडले..
डोके, वेणी हे शेर आवडले..
गंगाधर मुटे
रवि, 21/02/2010 - 05:22
Permalink
रमलो, डोके उशाला व वेणी हे
रमलो, डोके उशाला व वेणी हे जास्तच आवडले