मागील ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे.

जीवन कसे जगावे,सगळ्यांस पेच आहे
मागील ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे.

साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे

पूजन कुणां करावे?पुजण्यास कोण आहे ?
सैतान भासतो जे,ते दैवत हेच आहे

वार्धक्य टाळण्याचे,माहित कुणास आहे ?
मरणे अटळ तरीही,जगणे हवेच आहे

दुखः पुरुन उरावे,''कैल्या ''स ज्ञात आहे
सारुन हर समस्या,निघणे पुढेच आहे.

डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

जीवन कसे जगावे,सगळ्यांस पेच आहे
मागील ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे.

साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे

पूजन कुणां करावे?पुजण्यास कोण आहे ?
सैतान भासते जे,ते दैवत हेच आहे

वार्धक्य टाळण्याचे, ठाऊक ना कुणाला ?
मरणे अटळ तरीही,जगणे हवेच आहे

दु:खा पुरुन उरावे,''कैल्या ''स ज्ञात आहे
सारुन हर समस्या,निघणे पुढेच आहे.

डॉ.कैलास गायकवाड

ज्ञानेश च्या मार्गदर्शनानंतर गझलेत वरील बदल करुन प्रकाशित करवी हि विनंती.

जीवन कसे जगावे,सगळ्यांस पेच आहे
मागील ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे.

साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे

पूजन कुणां करावे?पुजण्यास कोण आहे ?
सैतान भासते जे,ते दैवत हेच आहे

वार्धक्य टाळण्याचे,ठाऊक ना कुणा ?
मरणे अटळ तरीही,जगणे हवेच आहे

दु:खा पुरुन उरावे,''कैल्या ''स ज्ञात आहे
सारुन हर समस्या,निघणे पुढेच आहे.

ज्ञानेश यंच्या मार्गदर्शनानंतर वरील बदल केले आहेत.
डॉ.कैलास गायकवाड

जीवन कसे जगावे,सगळ्यांस पेच आहे
मागिल ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे.

साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे

पूजन कुणां करावे?पुजण्यास कोण आहे ?
सैतान भासते जे,ते दैवत हेच आहे (सैतान भासते ते, दैवत असेच आहे)

वार्धक्य टाळण्याचे,ठाऊक ना कुणा ? (कुणाही)
मरणे अटळ तरीही,जगणे हवेच आहे

दु:खा पुरुन उरावे,''कैल्या ''स ज्ञात आहे
सारुन हर समस्या,निघणे पुढेच आहे. (हर च्या ऐवजी 'या' असे घेता येईल. हर हे हिंदी असावे.)

ज्ञानेश तुम्हाला अर्धवट काही सांगणार नाहीत. मला प्रामाणिकपणे वाटते की त्यांची सगळी मते आपण लक्षात घेतली नसावीत.

आशय आवडला.

ओळीस दाद दे तू गंधीत मोहराची
असलो कसा तरीही मीही कवीच आहे

धन्यवाद व शुभेच्छा!

मागील ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे. = यात वृत्त भंगले आहे.
मागिल ठरे शहाणा,पुढच्यास ठेच आहे. = यात 'मागिल' हे जरा विचित्र वाटते.
म्हणून माझेही एक सांगणे..
तो मागचा शहाणा! पुढच्यास ठेच आहे..

वार्धक्य टाळण्याचे,ठाऊक ना कुणा(ला)
मरणे अटळ तरीही,जगणे हवेच आहे

व्वा! छान.

साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे

यात काहीतरी गडबड आहे बरं का! वरील ओळीत जुन्या पुराण्या जखमा कशा साहत रहाव्या असे विचारले आहे. पण खालच्या ओळीत नवे दुखणे जुने वाटते आहे असे लिहिले आहे. खालील ओळीत जर भास दाखवायचा होता तर वरील ओळीतही तो हवा असे वाटते. कारण, साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या यामध्ये हा प्रश्न नेमका कोणाला पडला आहे? कवीला की जगाला असे वाटते आहे? खालील ओळीत दुखण्याबद्दल जे स्पष्टीकरण आहे त्याचा भास वर अपेक्षित आहे ना? म्हणजे इतरांना असे वाटते आहे की हे दुखणे किती जुने आहे जे सहन करणे अवघड आहे. आणि खालील ओळीत कवी सत्य सांगतो की ते जुने दिसत असले तरी नवेच आहे. मात्र, वरील ओळीत तो अर्थ स्पष्ट होत नाही असे वाटते.
तुमच्या ओळींमुळे मला माझी एक ओळ आठवली..
जखमा नव्यानव्याशा, दुखणे जुनेजुनेसे
ती गझल आत्तापर्यंत पूर्ण झालीच नाही.

पूजन कुणां करावे?पुजण्यास कोण आहे ?
सैतान भासते जे,ते दैवत हेच आहे (सैतान भासते ते, दैवत असेच आहे)

क्या बात है!!...धन्यवाद बेफिकिर....खरे तर मराठिगझल.कॉम च्या आप्ल्या प्रतिसादानंतर इथे इस्लाह करणारच होतो.........परंतु मझ्या मनात असलेले आपल्यागत नक्कीच नव्हते....पुनश्च धन्यवाद.....

तो मागचा शहाणा! पुढच्यास ठेच आहे......

मागिल मधील जरा खुपणारा........यात निघून मतला रापचिक होतोय...धन्यवाद....जोशीसाहेब.

वार्धक्य टाळण्याचे,ठाऊक ना कुणा(ला)
मरणे अटळ तरीही,जगणे हवेच आहे
व्वा! छान

मात्रामधील हा बदल ज्ञानेश यांनी सुच्वून सुद्धा मजकदून राहून गेला होता....आपले पुन्हएकदा आभार.....हा शेर आपणांस आवडला यास्तव खूप बरे वाटले.

साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे
यात काहीतरी गडबड आहे बरं का! वरील ओळीत जुन्या पुराण्या जखमा कशा साहत रहाव्या असे विचारले आहे. पण खालच्या ओळीत नवे दुखणे जुने वाटते आहे असे लिहिले आहे. खालील ओळीत जर भास दाखवायचा होता तर वरील ओळीतही तो हवा असे वाटते. कारण, साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या यामध्ये हा प्रश्न नेमका कोणाला पडला आहे? कवीला की जगाला असे वाटते आहे? खालील ओळीत दुखण्याबद्दल जे स्पष्टीकरण आहे त्याचा भास वर अपेक्षित आहे ना? म्हणजे इतरांना असे वाटते आहे की हे दुखणे किती जुने आहे जे सहन करणे अवघड आहे. आणि खालील ओळीत कवी सत्य सांगतो की ते जुने दिसत असले तरी नवेच आहे. मात्र, वरील ओळीत तो अर्थ स्पष्ट होत नाही असे वाटते.

जखमा जुन्या पुराण्या आहेत.....म्हणजेच त्या खूप काळापसून आहेत......सतत आहेत..बर्‍या झाल्या नाहीत....व त्यामुळे रोजचे दुखणे हे नवीनच आहे....जुन्या क्लेश्दायक आठवणी मनात रुंजी घालून सतत दु:ख देतात हे अपेक्षित आहे.

जखमा नव्यानव्याशा, दुखणे जुनेजुनेसे
अश्रुविना नसावे रडणे सुनेसुनेसे.

आपली ओळ छान आहे. धन्यवाद.

डॉ.कैलास
\

खुप छान. पुढच्यास ठेच, जुन्या पुराण्या आवडले.

पूजन कुणां करावे?पुजण्यास कोण आहे ?
सैतान भासतो जे,ते दैवत हेच आहे
छान आहे.