मिळेल का दोन घोट पाणी.....
जुळेल का भग्नता जराशी
भरेल का रिक्तता जराशी......
विचारतो जीव शीणलेला
मिळेल का शांतता जराशी
मिळेल का दोन घोट पाणी
निवेल का दग्धता जराशी
थकून गेलेत नेत्र माझे
हसेल का खिन्नता जराशी
नभात होईल भेट जेंव्हा
निघेल का भिन्नता जराशी....
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 28/05/2007 - 12:46
Permalink
हसेल का खिन्नता जराशी
मिळेल का दोन घोट पाणी
निवेल का दग्धता जराशी
वा!
थकून गेलेत नेत्र माझे
हसेल का खिन्नता जराशी
वा!
गझल फार आवडली.
धोंडोपंत
सोम, 28/05/2007 - 13:40
Permalink
सुंदर ग़ज़ल
वा !! सुंदर ग़ज़ल. कमी शब्दात खूप काही सांगणारी.
लगालगागा लगालगागा.... बह़र फार सुंदर निभावलेय.
जुळेल का भग्नता जराशी
भरेल का रिक्तता जराशी......
मतला झकास आहे. बाकीचे शेरही आवडले.
आपला,
(आनंदित) धोंडोपंत
मिळेल का दोन घोट पाणी
निवेल का दग्धता जराशी
थकून गेलेत नेत्र माझे
हसेल का खिन्नता जराशी
हे शेर सर्वात आवडले.
आपला,
(रत्नपारखी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
विसुनाना
सोम, 28/05/2007 - 13:58
Permalink
जराशी... गझल खूप आवडली!
परत एकदा - संयत, स्तब्ध गझल...खूपच छान.
(तुमच्या गझला वाचल्यानंतर उतू जाऊन मग भांड्यात शिल्लक उरलेल्या कोमट दुधाची आठवण येते. किंवा एखादा चक्रवात (टोरनॅडो) निघून गेल्यानंतर उरलेल्या गावाची ! का कुणास ठाऊक?!)
समीर चव्हाण (not verified)
सोम, 28/05/2007 - 16:31
Permalink
खूपच छान
मिळेल का दोन घोट पाणी
निवेल का दग्धता जराशी
प्रदीप कुलकर्णी
सोम, 28/05/2007 - 16:42
Permalink
छान
जुळेल का भग्नता जराशी
भरेल का रिक्तता जराशी......
छान...सोपी गझल...
मिळेल का दोन घोट पाणी
निवेल का दग्धता जराशी
थकून गेलेत नेत्र माझे
हसेल का खिन्नता जराशी
हेही छान....
..............
विचारतो जीव (शि) शीणलेला
मिळेल का शांतता जराशी
हीही कल्पना आवडली...
...........................................................
१) आवश्यक तिथे प्रश्नचिन्हे नकोत का...? का नकोत...?
२) पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्रारचिन्ह, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण इत्यादी इत्यादी या साऱ्यांना त्यांचा त्यांचा अर्थ असतो. परिणामी ही चिन्हेही लेखनाला अर्थ देत असतात. अर्थच्छटा देत असतात. (असतील तर) लेखनातील एकापेक्षा अधिक कंगोरे समोर आणत असतात.
कुमार जावडेकर
सोम, 28/05/2007 - 18:31
Permalink
वा!
अनंत,
गझल आवडली.. विशेषतः पहिले ४ शेर... काफियेही सुंदर आहेत आणि रदीफही आवडली.
हसेल का खिन्नता जराशी .. सुंदर!
- कुमार
पुलस्ति
मंगळ, 29/05/2007 - 01:51
Permalink
वा!
गझल खूप आवडली!
-- पुलस्ति.
प्रणव सदाशिव काळे
मंगळ, 29/05/2007 - 08:33
Permalink
विरोधाभास आवडले
सुंदर ग़ज़ल! विरोधाभास आवडले. भग्नतेचे जु़ळणे आणि भिन्नतेचे निघणे हे शब्दप्रयोग वेगळे वाटले.
अनंत ढवळे
रवि, 03/06/2007 - 14:32
Permalink
चिन्हे मुद्दाम टाळली आहेत
गझलेचा आशय तिच्या शब्दांमधून पुष्क्ळसा व्यक्त होत असल्याने , चिन्हांचा मोह शक्य तितका टाळण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
वृत्तांबद्दल आणि व्याकरणाबद्दल आजवर बरेच वाचले आहे , पण आशयाच्या आड मात्रा येऊ देणे मला अयोग्य वाटते .
प्रतिक्रियांबद्द्ल आभार !