माणसे....
माणसे....
माझा दुसरा प्रयत्न.........पहिल्या गझलेस आलेल्या प्रतिसदांस मी दिलेला प्रतिसाद अजुन प्रकाशित व्हायचाय....अजून तो रांगेत आहे.
अस्तास जाऊनिया स्मरतात माणसे ही
जित्तेपणी कशाला मरतात माणसे ही?
असुनी समोर चोरा, सोडुनी जाऊ देती
दुबळ्यास निरपराधि,धरतात माणसेही
कसले अ"धर्म" राजे?कसली अ"धर्म" निति?
द्युतात द्रौपदीला हरतात माणसेही
गर्दीत राहुनी जे मर्दुमकी करिती
एकांतवासी का मग डरतात माणसेही?
कितीही असोत पंखे, "कैल्या" तुझे जरी (पंखा = चाहता )
करण्या समीक्षणाशी,ऊरतात माणसेही..
---डॉ.कैलास गायकवाड.
गझल:
प्रतिसाद
कैलास
शुक्र, 22/01/2010 - 18:01
Permalink
अस्तास जाऊनिया स्मरतात माणसे
अस्तास जाऊनिया स्मरतात माणसे ही
जित्तेपणी कशाला मरतात माणसे ही?
असुनी समोर चोरा, सोडुनी जाऊ देती
दुबळ्यास निरपराधि,धरतात माणसेही
कसले अ"धर्म" राजे?कसली अ"धर्म" निति?
द्युतात द्रौपदीला हरतात माणसेही
गर्दीत राहुनी जे मर्दुमकी करिती
एकांतवासी का मग डरतात माणसेही?
कितीही असोत पंखे, "कैल्या" तुझे तरीपण (पंखा = चाहता )
करण्या समीक्षणाशी,ऊरतात माणसेही..
---डॉ.कैलास गायकवाड.
मक्त्यात कमी असलेल्या मात्रा,ज्ञानेश यांच्या मर्गद्र्शनानंतर बदल करुन लिहीला आहे.
बेफिकीर
शनि, 23/01/2010 - 08:10
Permalink
अस्तास जाउनीया स्मरतात माणसे
अस्तास जाउनीया स्मरतात माणसे ही - छान ओळ.
शुभेच्छा!
अजय अनंत जोशी
शनि, 23/01/2010 - 17:40
Permalink
गा गा ल गा ल गा गा, गा गा ल
गा गा ल गा ल गा गा, गा गा ल गा ल गा गा हेच वृत्त का वापरले नाही?
मक्त्यात अजूनही प्रॉब्लेमच आहे.
असुदे कितीक पंखे, 'कैल्या' तुझे तरीपण
करण्या समीक्षणाशी, उरतात माणसेही ... असे काही जमते का ते पहा.
गर्दीत राहुनी जे मर्दुमकी करिती
हेही तपासा!
र्हस्व-दीर्घ अजून तपासा.
'गझल परिचय' आवश्यक.
कैलास
बुध, 03/02/2010 - 20:13
Permalink
बेफिकीर अस्तास जाउनीया
बेफिकीर
अस्तास जाउनीया स्मरतात माणसे ही - छान ओळ
---आपले मनःपूर्वक आभार.
अजय अनंत जोशी
गा गा ल गा ल गा गा, गा गा ल गा ल गा गा हेच वृत्त का वापरले नाही?
---मी प्रकाशनाची घाई करतोय हे निश्चित..........वृत्त चुकल्याची जाणीव आपण निर्देशित केल्यानंतर झाली.
मक्त्यात अजूनही प्रॉब्लेमच आहे.
असुदे कितीक पंखे, 'कैल्या' तुझे तरीपण
करण्या समीक्षणाशी, उरतात माणसेही ... असे काही जमते का ते पहा
---होय..मक्त्यात गोम आहेच.....दुरुस्तीचा यत्न करतो.
उरतात माणसेही.....येथे ऊ वापरला गेलाय......
आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद.
डॉ.कैलास गायकवाड.