बाजार
तोडून पाश इथले, हा दूर चाललो मी
बहुधा नव्याच आता मोहात गुंतलो मी
दे तू मला तुझे ते आयुष्य फाटलेले
ठिगळे जुन्या सुखांची नेसून त्रासलो मी
उपयोग काय आता फाडून पत्र माझे
ते वाचताच तुझिया हृदयात उतरलो मी
दु:खासवे लढाया मी नित्य सज्ज होतो
पण सामना सुखाशी होताच बिचकलो मी
हातात हात आला, तोवर उशीर झाला
स्पर्शापल्याड होतो केव्हाच पोचलो मी
बाजार दाखवाया नेलेस अन् समजलो
येईल भाव तेथे इतका वधारलो मी
- नचिकेत जोशी
गझल:
प्रतिसाद
काव्यरसिक
शुक्र, 22/01/2010 - 23:43
Permalink
दु:खासवे लढाया मी नित्य सज्ज
दु:खासवे लढाया मी नित्य सज्ज होतो
पण सामना सुखाशी होताच बिचकलो मी
व्वा! सुरेख!
बेफिकीर
शनि, 23/01/2010 - 08:11
Permalink
बहुधा नव्याच आता मोहात गुंतलो
बहुधा नव्याच आता मोहात गुंतलो मी
उपयोग काय आता फाडून पत्र माझे
या ओळी व खालील शेर आवडला.
हातात हात आला, तोवर उशीर झाला
स्पर्शापल्याड होतो केव्हाच पोचलो मी
धन्यवाद!
ज्ञानेश.
शनि, 23/01/2010 - 09:24
Permalink
छान आहे गझल. "स्पर्शापल्याड
छान आहे गझल.
"स्पर्शापल्याड होतो केव्हाच पोचलो मी.." सुंदर आहे!
अजय अनंत जोशी
शनि, 23/01/2010 - 17:20
Permalink
दे तू मला तुझे ते आयुष्य
दे तू मला तुझे ते आयुष्य फाटलेले
ठिगळे जुन्या सुखांची नेसून त्रासलो मी
छान.
जुन्या सुखांची ठिगळे - छान.
केवळ 'जुन्या' असे न ठेवता जर
ठिगळे अता सुखांची नेसून त्रासलो मी
'अता' केले तर ....? किंवा इतर कोणताही 'लगा' शब्द.
कैलास
शनि, 23/01/2010 - 18:26
Permalink
हातात हात आला, तोवर उशीर
हातात हात आला, तोवर उशीर झाला
स्पर्शापल्याड होतो केव्हाच पोचलो मी
उत्तम शेर आहे.....गझल आवडली.
डॉ.कैलास गायकवाड.
अनिल रत्नाकर
मंगळ, 26/01/2010 - 15:33
Permalink
बाजार दाखवाया नेलेस अन्
बाजार दाखवाया नेलेस अन् समजलो
येईल भाव तेथे इतका वधारलो मी
वा! बहोत अच्छे!
बघता बघता आपल्याला लोक विकायला काढतात.
आनंदयात्री
गुरु, 04/02/2010 - 16:32
Permalink
सर्वांचे धन्यवाद... अजयजी,
सर्वांचे धन्यवाद...
अजयजी, शब्दबदल चालेलही. पण "जुन्या" मध्ये एक अर्थ आहे. म्हणून आहे तेच ठेवतो..
धन्यवाद...