अनेक वर्षे जमीन उजाड पडून आहे
अनेक वर्षे जमीन उजाड पडून आहे
अनेक वर्षे जमीन उजाड पडून आहे
न्याय तेवढा भरल्या ढगात लपून आहे
कसे राहिले कामाविनाच मजूर काही?
शहरामध्ये जुनी इमारत अजून आहे
ढग चालतात, रस्ता धावे, नदी वाहते
गेलो दमून इतका की मी बसून आहे
म्हटले मुद्दाम ,"सवड काढून ये जरा कधी"
आली नाही माझ्यावर ती रुसून आहे...
गोड बोलणे, भाषणबाजी, वाटाघाटी
निवडणुकीची तयारी कशी कसून आहे ..
हे मना तुझा ठावठिकाणा कळू दे मला
कसे यायचे ? सरळ रस्ता कुठून आहे?
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
मंगळ, 19/01/2010 - 19:09
Permalink
हे मना तुझा ठावठिकाणा कळू दे
हे मना तुझा ठावठिकाणा कळू दे मला
कसे यायचे ? सरळ रस्ता कुठून आहे? - व्वा! वा वा! सुंदर शेर! गझल आवडली.
अजय अनंत जोशी
बुध, 20/01/2010 - 17:27
Permalink
हे मना तुझा ठावठिकाणा कळू दे
हे मना तुझा ठावठिकाणा कळू दे मला
कसे यायचे ? सरळ रस्ता कुठून आहे?
या ओळी चांगल्या आहेत. पण, दुसर्या ओळीत एक मात्रा कमी. असे वाचावे लागते आहे...
कसे यायचे ? सरSSळ रस्ता कुठून आहे?
म्हटले मुद्दाम ,"सवड काढून ये जरा कधी"
आली नाही माझ्यावर ती रुसून आहे...
पहिल्या ओळीत... 'म्हटले मुदाम' असे वाचावे लागते आहे.
मुद्दाम = मुद् दा म असा होतो. (२+२+१ = ५ मात्रा)
कसे राहिले कामाविनाच मजूर काही?
शहरामध्ये जुनी इमारत अजून आहे
हा आवडला.
बेफिकीर
गुरु, 21/01/2010 - 15:40
Permalink
ढग चालतात, रस्ता धावे, नदी
ढग चालतात, रस्ता धावे, नदी वाहते
गेलो दमून इतका की मी बसून आहे
म्हटले मुद्दाम ,"सवड काढून ये जरा कधी"
आली नाही माझ्यावर ती रुसून आहे...
हे दोन शेर नीटसे समजले नाहीत. दुसरा शेर तसा सरळ आहे. पंण आपल्याला तेच म्हणायचे असेल असे वाटत नाही. कृपया कळावे.
कैलास
शुक्र, 22/01/2010 - 18:33
Permalink
अनेक वर्षे जमीन उजाड पडून
अनेक वर्षे जमीन उजाड पडून आहे
न्याय तेवढा भरल्या ढगात दडून आहे
मतला असा केल्यास कसा वाटेल?
डॉ.कैलास गायकवाड