रित
माझा पहीला प्रयत्न.........आपल्या सूचनांचा अभिलाषी...
चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही
जाहला तो भंग का त्या मैफिलीचा?
हर कुणी होउ शकत जगजीत नाही
वाघ ज्या प्राण्यास मी संबोधिलेले
जाहले ठाऊक तो ही धीट नाही
का असा दु:स्वास माझा तू करीतो
तो सुद्धा अन मी सुद्धा गुर्मीत ( गरमीत ) नाही
आहेस का कैलास चिंतातुर तू?
का तुझा मक्ता सदोदित नीट नाही
---डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
विश्वस्त
मंगळ, 19/01/2010 - 21:59
Permalink
यमके अलामतीनुसार/नियमांनुसार
यमके अलामतीनुसार/नियमांनुसार नाहीत. वीत, पीत, ईत अशी यमके हवीत.
ऋत्विक फाटक
मंगळ, 19/01/2010 - 23:10
Permalink
चेहर्याची चांगली ही रीत
चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही
वा: झकास! काय शेर आहे! मस्तच एंट्री मारलीत!
पहिला शेर सुचल्यावर त्या पायावर इतर रचलेले वाटताहेत.
दुसरा व तिसरा शेर चांगला.. तंत्राकडे लक्ष द्यावे.
शेवटच्या शेरातली पहिली ओळ वृत्तात नाही.
कैलास
बुध, 20/01/2010 - 16:24
Permalink
धीट आणि नीट ही यमके
धीट आणि नीट ही यमके अलामतीनुसार नाहीत. वीत, पीत, ईत अशी यमके हवीत...
-------आपल्या सूचनेनंतर गझल च्या अ ब क ड कडे पुनश्च वळलो.आपले मनपूर्वक आभार.
चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही
वा: झकास! काय शेर आहे! मस्तच एंट्री मारलीत!
.........आपल्या शब्दांनी अंगावर चिमूट्भर ..........आभार.....त्रिवार आभार.
पहिला शेर सुचल्यावर त्या पायावर इतर रचलेले वाटताहेत.
दुसरा व तिसरा शेर चांगला.. तंत्राकडे लक्ष द्यावे.
शेवटच्या शेरातली पहिली ओळ वृत्तात नाही.
गझलेच्या अ ब क ड कडे पुन्हा पहिले.......आपले म्हणणे रास्त आहे.....
पुढ्च्या प्रयत्नांत सुधारणा करण्याचा निश्चित कल असेल.
डॉ.कैलास गायकवाड.
अजय अनंत जोशी
बुध, 20/01/2010 - 17:30
Permalink
चेहर्याची चांगली ही रीत
चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही
आवडले.
विश्वस्तांच्या सूचनेकडे लक्ष द्या.
बेफिकीर
गुरु, 21/01/2010 - 15:33
Permalink
जाहला तो भंग का त्या
जाहला तो भंग का त्या मैफिलीचा?
हर कुणी होउ शकत जगजीत नाही
- अगदी खरे बोललात. (कोणत्या मैफिलीला तुमचे जाणे झाले? मला एकदा 'गझल नवाजां'च्या 'मैफिलीला जायचे आहे.)
विश्वस्त महोदय,
धीट आणि नीट ही यमके अलामतीनुसार नाहीत. वीत, पीत, ईत अशी यमके हवीत.
माझ्यामते या रचनेमधे 'ई' ही अलामत आहे. धीट व नीट ही यमकेच बेसिकली चुकीची आहेत. पण या यमकांमधील अलामत मात्र ठीक असावी. आपले मार्गदर्शन मिळावे.
कैलास
गुरु, 21/01/2010 - 18:44
Permalink
अजय अनंत जोशी आणी
अजय अनंत जोशी आणी बेफिकीर....प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
जगजीत सिंग इन लाइव्ह कॉन्सर्ट अशा एका कर्यक्रमात वाशि येथे गेलो होतो.....
'गझल नवाजां'च्या 'मैफिलीला मलाही जयचे आहे.......यमक जुळत असते तर आज गझल्नवाझच इथे असते.
डॉ.कैलास गायकवाड.
कैलास
शनि, 23/01/2010 - 22:26
Permalink
चेहर्याची चांगली ही रीत
चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही
जाहला तो भंग का त्या मैफिलीचा?
हर कुणी होउ शकत जगजीत नाही
वाघ त्या प्राण्यास का संबोधिले मी ?
का मला वाटे कुणा तो भीत नाही?
का असा दु:स्वास माझा तू करीतो
तो सुद्धा अन मी सुद्धा गुर्मीत ( गरमीत ) नाही
का असा कैलास चिंतातुर रे तू ?
का तुझा मक्ता कधी संधीत नाही ?
यमके अलामतीनुसार/नियमांनुसार नाहीत. वीत, पीत, ईत अशी यमके हवीत-----विश्वस्त
यमके अलामतीनुसार करुन ....चांगली करण्याचा मझा हा प्रयत्न.
डॉ.कैलास गायकवाड.
अजय अनंत जोशी
सोम, 25/01/2010 - 21:08
Permalink
यमके अलामतीनुसार/नियमांनुसार
यमके अलामतीनुसार/नियमांनुसार नाहीत. वीत, पीत, ईत अशी यमके हवीत. = विश्वस्त
हे विश्वस्तांचे म्हणणे रास्त मानून डॉ. कैलास यांचा प्रयत्न चांगला आहे.
बेफिकीर,
विश्वस्तांनी 'अलामतीनुसार/नियमांनुसार नाहीत' असे म्हटले आहे.
म्हणजे, एकतर धीट आणि वीत असे दोनही शब्द चालवायचे असतील तर 'अ' हा स्वरकाफिया घ्यावा लागेल. पण तसे मतल्यातच दिसायला हवे. जर ईत हे यमक घ्यावयाचे असेल तर धीट चालणार नाही.
'ईत' प्रमाणे आपल्या गझलेत डॉ. कैलास यांनी केलेले बदल मान्य.
कैलास
सोम, 25/01/2010 - 21:31
Permalink
अजय अनंत जोशी आपले मनःपूर्वक
अजय अनंत जोशी
आपले मनःपूर्वक आभार......पुढील गझल दोषमुक्त असावी या करिता उपलब्ध सर्व गझलांचे वाचन ,मात्रा,व्रूत्त....यांजसंबंधी अधिकाधिक माहिती मिळवून मगच आपल्या अवलोकनार्थ ठेवायचा प्रयत्न करेन.
आपल्या प्रतिसादाने अजून प्रेरणा मीळाली......धन्यवाद.
डॉ.कैलास गायकवाड.
मिल्या
रवि, 31/01/2010 - 23:51
Permalink
कैलासजी पहिलाच प्रयत्न चांगला
कैलासजी पहिलाच प्रयत्न चांगला आहे...
मतला आवडला.. शुभेच्छा
कैलास
बुध, 03/02/2010 - 18:00
Permalink
धन्यवाद ''
धन्यवाद '' मिल्या''.....
कैल्या