कुणाकुणावर अजूनही तो प्रभाव होता

नको असे पण अजून त्यांना लगाव होता
कुणाकुणावर अजूनही तो प्रभाव होता

मिळेल कीर्ति उगाच मोठी पिटून टाळ्या
कुणाकुणाच्या मनात हाही तणाव होता

कसे विसरलो तिथेच आम्ही विचार अमुचे
चुकून झाले; तसा न कुठला ठराव होता

कितीक खुर्च्या भरून होत्या पुराणिकांच्या
तरी मिळाली न त्यास ज्याचा दबाव होता

उगाच डोळे करून मोठे बघू नका हो...
घरातले बोलले, न कुठला उठाव होता

असेच समजा तुम्हांस हाती न लागलेला
कधी अजयने असाच केला सराव होता

गझल: 

प्रतिसाद

वा वा छान!

नको असे पण अजून त्यांना लगाव होता (लगाव? एकदम हिंदी का हो?)
कुणाकुणावर अजूनही तो प्रभाव होता - हा हा! खरे आहे.

मिळेल कीर्ति उगाच मोठी पिटून टाळ्या - की'र्ती' - र्ती दीर्घ पाहिजे का?
कुणाकुणाच्या मनात हाही तणाव होता - हा हा हा हा!

कसे विसरलो तिथेच आम्ही विचार अमुचे
चुकून झाले; तसा न कुठला ठराव होता - वा वा!

कितीक खुर्च्या भरून होत्या पुराणिकांच्या
तरी मिळाली न त्यास ज्याचा दबाव होता - व्वा व्वा! अतिशय सुंदर!

उगाच डोळे करून मोठे बघू नका हो...
घरातले बोलले, न कुठला उठाव होता - हा हा!

असेच समजा तुम्हांस हाती न लागलेला
कधी अजयने असाच केला सराव होता - म्हणजे काय?

कीर्ती असे हवे होते.

उगाच डोळे करून मोठे बघू नका हो...
घरातले बोलले, न कुठला उठाव होता

गैरसमज नको हे मांडायची पध्दत अप्रतिम.

मला आवडलेला शेर :

मिळेल कीर्ति उगाच मोठी पिटून टाळ्या
कुणाकुणाच्या मनात हाही तणाव होता

उत्तम गझल.
राम क्रुष्ण हरी!!!