फार झाले
स्वप्नात ती आज मा़झ्या, फार झाले!
स्वप्नात मी आज तीच्या, फार झाले!
आलाच तो श्वास कानी गंधलेला
"आहेस ठोंब्या" म्हणाली, फार झाले!
आली मला तीच भेटाया त्वरेने
"आहेस माझा" म्हणाली, फार झाले!
हे प्रेम की वासना नाही कळाले
"वा! रे शहाणा" म्हणाली, फार झाले!
मी शेवटी तो दिला होकार माझा
"आहेस वेडा" म्हणाली, फार झाले!
ताब्यात ना हालचाली आज माझ्या
"घे हात हाती " म्हणाली, फार झाले!
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
शुक्र, 15/01/2010 - 17:28
Permalink
आपण कृपया 'काफिया, रदीफ व
आपण कृपया 'काफिया, रदीफ व काफियाबरोबरच आपोआप पाळली जाणारी अलामत' या सर्व बाबी पाळाव्यात.
मतल्यातील 'माझ्या व तीच्या' या स्वरकफियांनतर पुढील शेरात अचानक 'म्हणाली' हा शब्द काफियाच्या जागी आलेला दिसतो.
कृपया गैरसमज नसावा.
अजय अनंत जोशी
शुक्र, 15/01/2010 - 23:24
Permalink
खरे आहे. आपल्या गझलेत रदीफ,
खरे आहे.
आपल्या गझलेत रदीफ, काफिया आणि अलामत सर्वच बदलले आहे.
म्हणाली हे रदीफात घेतले तर मतला सोडूनच द्यावा लागतो. त्याचप्रमाणे, वेडा आणि हाती या शेवटच्या दोन द्विपदींमधील अलामत भंगली आहे.
उर्दू काव्यात अलामतीला फारसे महत्व नसून ते भटांनी आणले असा एक प्रवाह आहे. (उघड कोणी बोलणार नाही पण लपून-छपून बोलतात. )
अलामतीमुळे आशयावर गदा येते असे एक मत, तर अलामतीने उच्चारात सौंदर्य येते हे माझे मत.
अनिल रत्नाकर
शुक्र, 15/01/2010 - 23:53
Permalink
माफ करावे, गझल प्रकाशित
माफ करावे,
गझल प्रकाशित करण्याच्या उत्साहात चूक झाली.
धन्यावाद.
अनिल रत्नाकर
शनि, 16/01/2010 - 08:28
Permalink
माझी ही गझल काढून टाकावी ही
माझी ही गझल काढून टाकावी ही नम्र विनंती.
चूक आढळ्ल्यास वर्कस्पेसमध्येच दर्शविल्यास सगळ्यांसमोर यायच्याआधी सुधारणा करता येईल.
धन्यवाद.
बेफिकीर
शनि, 16/01/2010 - 10:28
Permalink
अजय, उर्दू काव्यात अलामतीला
अजय,
उर्दू काव्यात अलामतीला फारसे महत्व नसून ते भटांनी आणले असा एक प्रवाह आहे. (उघड कोणी बोलणार नाही पण लपून-छपून बोलतात. )
अलामतीमुळे आशयावर गदा येते असे एक मत, तर अलामतीने उच्चारात सौंदर्य येते हे माझे मत.
माझी मते:
१. उर्दू काव्यात (गझलेत) अलामत बहुतांशीवेळा पाळली जाते असे माझे मत आहे. (अलामत न पाळलेल्या उर्दू शेरांची कृपया काही उदाहरणे असल्यास द्यावीत.)
२. भटांना उगाचच मराठी गझलेत अलामत आणायचे काही कारण नसणार. ती उर्दू गझलांमधे जाणवल्याशिवाय ते कशाला आणतील?
धन्यवाद!
अजय अनंत जोशी
शनि, 16/01/2010 - 17:26
Permalink
मी कुठे म्हणतो आहे की अलामत
मी कुठे म्हणतो आहे की अलामत नको म्हणून.
अलामतीमुळे आशयावर गदा येते असे एक मत, तर अलामतीने उच्चारात सौंदर्य येते हे माझे मत.
असेच मी लिहिले आहे.
हां, आता माझ्या ओळींचा उल्लेख करून तुम्ही इतरांना(म्हणजे अलामत नको असणार्यांना) आवाहन केले असल्यास ठीक.