'गालिब'च्या गजलेचा भावानुवाद


कोणती इच्छा सफल होत नाही
कुणाचा चेहरा मला दिसत नाही...


मृत्यु निश्चित एकदा आहे तरी
रात्रभर का झोप मजला येत नाही?...


हसू यायचे परिस्थितीवर पूर्वी
मी अता कशावरही हसत नाही...


मी जिथे आहे तिथे आज मजला
बातमी माझी स्वतःची मिळत नाही!...


काहि कारण गप्प मी आहे खरा
अन्यथा का बोलणे  जमत नाही?...


मी मरेस्तो वाट बघतो मृत्युची
मरण येते; पण तरीही येत नाही... (अजब)


मूळ गजलः


कोई उमीद बर नही आती
कोई सूरत नजर नही आती...


मौत का एक दिन मुअय्यन है
नींद क्यूं रातभर नही आती...


आगे आती थी हाल्-ए-दिल पे हंसी
अब किसी बात पर नही आती...


हम जहां हैं वहां से हम को भी
कुछ हमारी खबर नही आती...


है कुछ ऐसी ही बात जो चुप हूं
वरना क्या बात कर नही आती?...


मरते हैं आरजू में मरने की
मौत आती है पर नही आती... (गालिब)

गझल: 

प्रतिसाद

उर्दू शायरीच्या भावानुवादासंदर्भात नुकताच http://www.misalpav.com/node/356 हा लेख वाचनात आला. माझ्या मते त्यातले विचार पटण्याजोगे आहेत!
असो,
तात्या.

(उर्दूप्रेमी) धोंडोपंताशी शंभर टक्के सहमत

नुसते मनोरंजनच?
- माधव वझे
मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात व्यावसायिक नाट्य स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.सकस जीवनानुभव प्रेक्षकांबरोबर वाटून घेण्याचे रंगभूमीचे दिवस संपल्याची जाणीव या निमित्ताने झाली. यामध्ये चूक कोणाची? सजग प्रेक्षकाची, की वास्तववाद नाकारणाऱ्या आजच्या रंगभूमीची?
आपल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने, web hosting मार्च महिन्यामध्ये व्यावसायिक नाट्य स्पर्धांचे आयोजन मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरात केले होते. स्पर्धेचे हे एकविसावे वर्ष. सातत्याने दीर्घकाळ व्यावसायिक व हौशी राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करणारे, देशामधील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, याचा सार्थ अभिमान, राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये तर अवश्‍य असणारा आहे. राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविताना, अर्थातच या स्पर्धांचेही सिंहावलोकन केले जाईल व अधिक चोखंदळपणे व जोमाने या स्पर्धा भरविल्या जातील, अशी अपेक्षा करू या.

हे 'रंगभूमीची व्यथा' प्रकरण 'कोई उम्मीद' च्या प्रतिसादात कसे काय आले असावे?

अजब -

१. अनुवाद वृत्तात असायला हवा होता असे वाटले.
२. हाल-ए-दिल चा अनुवाद 'परिस्थिती' असा करणे वेगळेच वाटले. तो मनस्थिती किंवा मनोवस्था असावा असे वाटले.
३. हमको हमारी खबर - यात खबर ही बातमी या अर्थाने नसावी. या शेरात खबर म्हणजे 'स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव' असे असावे.

अर्थात, बराच पुर्वीचा अनुवाद आहे.

धन्यवाद!

कोई उमीद बर नही आती
कोई सूरत नजर नही आती...

याचा अर्थ : कुठलिही इच्छा पूर्ण होत नाही आणि ती पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत असा आहे....... आपण तो शब्दशः .... कुणाचा चेहरा मला दिसत नाही असा घेतला आहे.

बाकी भावानुवाद ठीक आहे.

डॉ.कैलास