अनोळखी होऊन जगावे....

अनोळखी होऊन जगावे... असे वाटते
स्वत:स विसरुन वेडे व्हावे, असे वाटते

गीत तुझे, ओठावर येणे शक्यच नाही
हृदयामध्ये... निवांत गावे असे वाटते

तुला स्वत:ची ओळख अजुनी पटली नाही
हेच तुला मी समजुन द्यावे... असे वाटते

एकटेपणी निरखुन घे तू स्वत:स आता
तुला 'तुझे' प्रतिबिंब दिसावे, असे वाटते

तुझ्या अंतरी दडलेल्या त्या 'गांधर्वीला'
मोकळेपणी व्यक्त करावे... असे वाटते

बोचरेपणा स्वभावात या माझ्या नाही
तरी तुला मी हेटाळावे... असे वाटते

कधीतरी तू समजुन घेशील माझी तळमळ
समजूतीने.... तू वागावे, असे वाटते

खरेच आहे तुझ्यामधे लौकीक-मरातब
त्यास कधी ना तू गमवावे, असे वाटते

फोल अपेक्षांच्या मागे तू धावतेस का?
ध्येय तुझे तुज कळून यावे, असे वाटते

दिशाहीन होऊन, अशी तू भरकटलेली
जगण्याचे तुज ध्रुव मिळावे, असे वाटते

तुला तुझे अस्तित्व निरामय कळून येण्या
'उशीर होइल', असे न व्हावे, असे वाटते

अनोळखी होऊन भेटुया आपण आता
ओळखिचे 'संदर्भ' नसावे, असे वाटते

- जनार्दन केशव म्हात्रे
म्हात्रे निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड, कळवा-ठाणे ४००६०५, भ्रमणध्वनी : ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

अनोळखी होऊन जगावे... असे वाटते
स्वत:स विसरुन वेडे व्हावे, असे वाटते

गीत तुझे, ओठावर येणे शक्यच नाही
हृदयामध्ये... निवांत गावे असे वाटते

तुला स्वत:ची ओळख अजुनी पटली नाही
हेच तुला मी समजुन द्यावे... असे वाटते

एकटेपणी निरखुन घे तू स्वत:स आता
तुला 'तुझे' प्रतिबिंब दिसावे, असे वाटते

तुझ्या अंतरी दडलेल्या त्या 'गांधर्वीला'
मोकळेपणी व्यक्त करावे.... असे वाटते

बोचरेपणा स्वभावात या माझ्या नाही
तरी तुला मी हेटाळावे.... असे वाटते

कधीतरी तू समजुन घेशील माझी तळमळ
समजूतीने.... तू वागावे, असे वाटते

खरेच आहे तुझ्यामधे लौकीक-मरातब
त्यास कधी ना तू गमवावे, असे वाटते

फोल अपेक्षांच्या मागे तू धावतेस का?
ध्येय तुझे तुज कळून यावे, असे वाटते

दिशाहीन होऊन, अशी तू भरकटलेली
जगण्याचे तुज ध्रुव मिळावे, असे वाटते

तुला तुझे अस्तित्व निरामय कळून येण्या
'उशीर होइल', असे न व्हावे, असे वाटते

अनोळखी होऊन भेटुया आपण आता
ओळखिचे 'संदर्भ' नसावे, असे वाटते

- जनार्दन केशव म्हात्रे
म्हात्रे निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड, कळवा-ठाणे ४००६०५, भ्रमणध्वनी : ९३२३५५५६८८

मक्ता आवडला. एकंदर छान गझल.

खूपच छान लिहिले आहेस........

खुप छान. निवांत गावे आवडले.