माकडे ही
माजलेली चाल त्याची माकडेही चालती
माणसाची क्षूद्रवॄत्ती माकडेही जाणती
भासणारे भाबडे ते भांगडाही नाचती
रोज टोप्या सज्जनांना माकडे ही घालती
चोरदारी चोंबडे ते काकडाही जाळ्ती
लाळघोट्या माणसाला माकडेही पाळती
माणसे ही स्वार्थ-साधू नागडेही राहती
पाहुनी हे वेड-चाळे माकडेही लाजती
लोचटांच्या या जगाच्या देखता चाली-रिती
तोंड मोठे आश्चर्याने माकडेही वासती
तोलताना माप सच्चे सूक्ष्म मावा चाखती
हाच आहे दोस्त त्याला माकडेही मानती
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
रवि, 06/12/2009 - 20:16
Permalink
या 'गझले'वरून अस्मादिकांना
या 'गझले'वरून अस्मादिकांना स्वतःचा एक शेर आठवला:
तू कशाला लाजतो आहेस भूषण?
शेवटी माणूस झाली वानरेही
त्याच अनुषंगाने चित्तरंजन यांचा एक भन्नाट शेरही आठवला:
कणा वाकल्यावर तो शिकला विनायास कोलांट्या घेणे
आधी तो माणूसच होता त्याचे माकड नंतर झाले
तंत्रासाठी अभिनंदन! ('आश्चर्याने' हा शब्द सोडून)!
मात्र, 'गझल' फारच 'दणदणीत' झाली आहे असे वाटले.
ऋत्विक फाटक
रवि, 06/12/2009 - 20:53
Permalink
छान, चांगली झालीये गझल.
छान, चांगली झालीये गझल.
अनिल रत्नाकर
सोम, 07/12/2009 - 23:52
Permalink
बेफिकीरजी, तुमच्या
बेफिकीरजी,
तुमच्या प्रतिसादांनी उत्साह वाढतो हे निश्चित.
धन्यवाद.
"अस्मादिक" शब्द मा़झे पिताश्रीही वापरत असल्याने परिचयाचा होता. छान वाटले.
आपला शेरही अफलातून आहे.
कर्तव्याला, आश्चर्याला, तात्पर्याला, सातत्याला, पूर्णत्वाला इ. शब्द कोणत्या वॄत्तात वापरता येतील.
-- (गागा गागा) -- असे करता येईल का?
मोठेपणा म्हणून सांगत नाही तंत्र येत नव्ह्ते असे नाही, पण त्यात नवे शोधण्याचा प्रयत्न मोठ्या गझलकारांना रुचत नाही की काय अशी भीती वाटते, म्हणून हात थरथरतो.
अभिनंदनाबद्दल मनःपूर्वक आभार.
ॠत्विकजी
आपल्याला कोटीकोटी धन्यवाद.