|| मुखवटा ||

|| मुखवटा ||
.

वृत्त : आनंदकंद ( गागालगा लगागा गागालगा लगागा )

|| मुखवटा ||
---------------

ग्रीष्मात थाटलेला, खोटा वसंत आहे
हा साज चेहर्‍याचा, कावा निरंत आहे

मी पाप काय केले, नक्कीच जाण त्याची
आतून मी हरामी, बाहेर संत आहे

हे काम क्रोध माझे, आहेत मित्र पक्के
मोहात रंगतांना , कोठे उसंत आहे ?

अंतस्थ वासनांचा, थैमान खेळ चाले
चारित्र्य स्वछतेचा, दावा अनंत आहे

गंगेत डुंबल्याने, पुण्यांत वाढ होते
देवास भोंदतांना, खासा जिवंत आहे !

अस्वस्थ वेदानांना , "मुक्ती" नशीब नाही
पापात जन्म जाता, शापात अंत आहे.

नाही समेवरी मी, आयुष्य संपताना
मात्रा चुकून गेल्या, याचीच खंत आहे..

--- आकाश बिरारी
.

गझल: 

प्रतिसाद

गझल चांगली आहे.

अंतस्थ वासनांचा, थैमान खेळ चाले
चारित्र्य स्वछतेचा, दावा अनंत आहे

या ओळी छान जुळल्या आहेत.

नाही समेवरी मी, आयुष्य संपताना
मात्रा चुकून गेल्या, याचीच खंत आहे..
सुंदर!

नाही समेवरी मी, आयुष्य संपताना

व्वा.......

नाही समेवरी मी, आयुष्य संपताना
मात्रा चुकून गेल्या, याचीच खंत आहे..

अप्रतिम! सगळीच गझल आवडली, हे खास!

(रात्रीचा प्रतिसाद)

तिसरा व शेवटचा शेर आवडले.

गझल आवडलीच.

मी पाप काय केले, नक्कीच जाण त्याची
आतून मी हरामी, बाहेर संत आहे

हा शेर आवडला..!

-दिलीप बिरुटे

नाही समेवरी मी, आयुष्य संपताना
मात्रा चुकून गेल्या, याचीच खंत आहे.. >>> मस्तच

अंतस्थ वासनांचा, थैमान खेळ चाले
चारित्र्य स्वछतेचा, दावा अनंत आहे

नाही समेवरी मी, आयुष्य संपताना
मात्रा चुकून गेल्या, याचीच खंत आहे..

उत्तम!!!