पादुका

कसे ठकविले जगास सार्‍या नको गर्व हा फुका
नशीब बेणे कधीतरी लावेल तुलाही थुका

खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका

जगण्यामध्ये आताशा कसलाच समन्वय नसे
म्हैस पाहिली टीव्हीवरती नाव जिचे नाजुका

पैशापुढे न झुकतो कधिही स्वाभिमान आमुचा
त्यासाठी तर आणा भरुनी डॉलरने संदुका

नवल काय जर तोंडघशी पडलास काल तू पुन्हा
गेलास घ्यायला उंटाच्या टिंब टिंब (...) चा मुका

जेवण तयार श्रेष्ठी तरिही करेनात वाटणी
किती दिवस उपवास सोसला अता लागल्या भुका

भेकड नेते का दिल्लीचे पाय सदा चाटती?
मायमराठी पुजते आता हिंदीच्या पादुका

गझल: 

प्रतिसाद

मस्त! सुरेख हझल!

खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका

असा दम भरल्यामुळे आता चुका दखवायचा प्रश्नच येत नाही!

नवल काय जर तोंडघशी पडलास काल तू पुन्हा

चांगला मिसरा!

जगण्यामध्ये आताशा कसलाच समन्वय नसे
म्हैस पाहिली टीव्हीवरती नाव जिचे नाजुका
येड्या पिंपोळ्याचा सरपंच रागवेल बरं !

जेवण तयार श्रेष्ठी - सुंदर.

खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका
हे लिहून फार छान केलेत.

छान हजल.

धन्यवाद सर्वांना

ऋत्विक : हा हा :)

हझल आवडली.

जेवण तयार श्रेष्ठी तरिही करेनात वाटणी
किती दिवस उपवास सोसला अता लागल्या भुका

वा! फार छान.

खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका

वा. माझेही मत फाटकांसारखेच. नाजुकाही छानच.

खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका

हा हा हा हे बाकी बरं केलं.
दाद नको पण समीक्षा आवरा असे म्हणायची वेळ येते. :)

मस्त, पुढच्या गझलेच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

चित्त, दिलिप धन्यवाद

चित्त, ऋत्विक अहो चुका शेर माझ्यासाठी लागू करू नका :) तो इतरांसाठी होता :)
मला बिनदास्त चुका सांगत जा.. त्यातून शिकायलाच मदत होईल हे नक्की

नवल काय जर तोंडघशी पडलास काल तू पुन्हा
गेलास घ्यायला उंटाच्या टिंब टिंब (...) चा मुका

छानच हजल...

डॉ.कैलास

सही !! हजल मस्तच !!
मिल्याची गझल वाटतेय पक्की :)

व्वा ! मस्त आवडली ..!!

माय मराठी आवडले.