पहा, शांत झाला..

किती खाज होती, किती खुमखुमी
पहा, शांत झाला अबू आझमी

अता हाच संदेश देशामधे...
...मराठी कुठे राहिली संयमी?

'महाराष्ट्र देशी नुरे सभ्यता'
--अशी वाहिन्यांवर मिळे बातमी

जुना बाप जर्जर मराठी तुझा
नवा बाप देतो हिताची हमी

कसे काय पत्ते कुणाचे पुढे...?
खरे मात्र हे, राजची ही रमी !

गझल: 

प्रतिसाद

रचना सफाईदार आहे.

हा.. हा.. हा!

एकदम 'समयोचित' रचना बरं का!

केदारवा ,
तोहरी गजल मनसे भा गई भैय्या!
'बाप'चे शेर बाप शेर आहेत.
जयन्ता५२

वा:
अबू आझमीला किती लीलया वृत्तात बसवलात!

पहिल्या उकाराची सवलत घेतलेली सफाईदार रचना
सुंदर विनोदी काव्य.

पूर्वी नाव न लिहिता केलेल्या माझ्या रचना 'शेरेबाजी' म्हणून निद्रिस्त होत होत्या. परंतु, नाव घेऊन जागृत झालेली तुमची रचना पाहून आनंद झाला. पुन्हा उर्मी आली.
यासाठी सर्वांचे धन्यवाद.

खरंय..
सफाईदार रचना...

गझल की हझल वाचून सखेद आश्चर्य वाटले व प्रतिसाद वाचून मनोरंजन झाले.

गझलला असे काव्य तंत्रातले
कधीपासुनी जाहले लाजमी?

मला काय बोलायचे ना कळे
मनाची कमी की जनाची कमी?

-बेफिकीर!

धन्यवाद सर्वांना.

माझ्या मनात प्रश्न होता. या रचनेला गंमतीदार गझल म्हटले जावे की हजल?

आपण हा प्रश्न 'मला' विचारलेला नाहीत हे माहीत आहे.
पण सार्वजनिकरीत्या प्रश्न आलेला आहे म्हणून मत देत आहे.
माझ्यामते ही गझलही नाही व हझलही नाही.
पण माझ्या मताला काही महत्वही नाही हेही नमूद करायला हवे.

- 'बेफिकीर'!

गझलेत असे विशय येवू शक्तात का?

ही रचना सफाईदार आहे ते केवळ आणि केवळ मात्रांच्या दृष्टीने. ही गझल नाही हे नक्की.
हझलबाबत विचार करायला वाव आहे. मात्र गझलेचा बाज येथे कुठेच येत नाही. याला विनोदी कविता म्हणता येईल आणि लोक त्याची मजाही घेतील.

केदारजी

माझ्या मते गझलेच्या नियमाप्रमाणे ( प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता असतो, व त्याचा स्वतंत्रपणे आस्वाद घेता येऊ शकतो ) ही सध्याच्या काळात गझल/हझल म्हणून स्वीकारता येईल. परंतू अजून अजून काही महिन्यांनी कदाचित यातील कोणताच शेर स्वतंत्र कविता म्हणून वाचला तर त्याचा अर्थ लागणार नाही. ( लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणतो की थेट उल्लेख केल्यामुळे हे अल्पायुषी शेर आहेत ) अजून थोड्या दिवसांनी ही एक कविता म्हणूनच वाचावी लागेल

"बांधू हवेत किल्ला बाका बुलुंद यंदा
त्या क्रांतीकारकांचा आवाज बंद यंदा "

जो झुंजणार होता तो हा नसे रिसाला
ही फौज गाढवांची जी नालबंद यंदा"........( हे दोन शेर जसे आठवलेत तसे दिलेत, चु.भु.दे.घे.)

ही रचना मी जे ऐकलय त्याप्रमाणे दादांनी १९७७ साली जनता सरकार गडगडले त्या संदर्भात केली होती. ही रचना जशी ७७ सालच्या जनता सरकारला लागू पडते तशी यंदाच्या निवडणूकीत पराभव स्वीकारायला लागलेल्या युतीलाही लागू पडते...... वर्ल्डकप आणणार असा गाजावाजा करून गेलेल्या व बांगलादेशाकडून मार खाऊन पहिल्याच फेरीत बाहेर पडलेल्या भारतीय टीमला ही लागू पडते.

( ही माझी वैयक्तीक मतं आहेत )

पण रचना मस्त आहे, खूप मजा आली वाचताना :)

प्रसाद,

तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे.