काळजावर वेदनांची चाल आहे

काळजावर वेदनांची चाल आहे
'हासणे' माझी पुराणी ढाल आहे

काल ज्याची मागणी संपून गेली
आणला मी नेमका तो माल आहे

ते म्हणाले 'खा हवा अन् आसवे प्या'
'बांधवानो, हे सुगीचे साल आहे!'

द्या मते,लक्षात ठेवा की निशाणी
'पाच बोटे उमटलेला गाल आहे!'

सम जुळेना कां सुखाशी एकदाही?
जीवनाचा, हाय! चुकला ताल आहे

----------------------------------------------------------
जयन्ता५२

गझल: 

प्रतिसाद

छान रचना!
सम जुळेना कां सुखाशी एकदाही?
जीवनाचा, हाय! चुकला ताल आहे

काल ज्याची मागणी संपून गेली
आणला मी नेमका तो माल आहे

कवीची 'स्वतःचा माल बाजारात विकायला आणतानाची' निर्भीडता व प्रांजळता फार भावली.

-'बेफिकीर'!

संयमित गझल.

ॠत्विक,अर्चना
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
जयन्ता५२