बहुधा

त्याला माझे मोहरणे रुचलेच नसावे
त्याचे माझे बंध कधी जुळलेच नसावे

शब्दांचे हे गाव पोरके, केविलवाणे,
भावार्थाचे बीज इथे रुजलेच नसावे

भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे !

त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे

मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे

येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !

कालकुपीतुन काही क्षण हलकेच चोरले,
त्यांत जशी जगले मी, कधि जगलेच नसावे !

पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !

गझल: 

प्रतिसाद

वेगळीच गझल आहे! चांगली आहे.

येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !

वा: क्या बात है!

मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे

यात काय म्हणायचंय नक्की?

वा वा! शेवटचा शेर फार आवडला!! बाकी गझलही छानच आहे.

त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे

वा..वा

येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे
!
सुंदर!

पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !

अप्रतिम!!

आवडली आपली गझल.

पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !

अप्रतिम शेर आहे हा. खूपच छान.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा

आपला,
(वाचक) धोंडोपंत

त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे

वाव्वा!

पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !

वाव्वा. अतिशय सुरेख!

एकंदर गझल चांगली आहे. आवडली.

आषाढाचे आमंत्रण व दवबिंदूचे शेर आवडले.

-बेफिकीर!

भन्नाट

येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !

पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !
वा वा, क्रांति हा शेर अतिशय आवडला. खूप मस्त झाला आहे.

भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
येता जाता श्रावण येथे थांबत होता,

--- वा!स्मरणीय शेर,
भासांनी सावल्या जपाव्या....मस्त!
जयन्ता५२