जशी रात्र झाली...
जशी रात्र झाली, तुझी याद आली
तुझी याद आली, तुझी याद आली
लयीच्या विना हे सुने शब्द माझे
जरा बांध चाली..तुझी याद आली
इथे ऐकतो मी तुझी श्वासमाला
हवा दूत झाली..तुझी याद आली
पहायास ये झुंबरे तारकांची
सखे ये महाली..तुझी याद आली
अशा शांत वेळी कुठे मी स्वतःचा ?
तुझ्या मी हवाली !तुझी याद आली !
संकेतस्थळावरील सर्व गझलकार व गझलतज्ज्ञांचे दीपावलीनिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन..!
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
शनि, 10/10/2009 - 16:14
Permalink
केदार- दीपावलीच्या
केदार- दीपावलीच्या शुभेच्छा!
शेवटचा शेर आवडला.
मतला मात्र योग्य वाटत नाही.
बेफिकीर
शनि, 10/10/2009 - 17:49
Permalink
पुण्याला पुन्हा कोकणी साद
पुण्याला पुन्हा कोकणी साद आली
कळाली खुशाली 'तुझी याद आली'
दिवाळीस घरड्यास लागेल सुट्टी
शुभेच्छा मिळाली... 'तुझी याद आली'
तुलाही शुभेच्छा पुणे गाठण्याच्या
तुझा 'परशु' वाली ...'तुझी याद आली
किती बोलकी बोलकी ओळ याची
मलाही कळाली.. तुझी याद आली
नको 'बेफिकिर' तू छळू माणसांना
गझल छान झाली, तुझी याद आली
-सविनय
'बेफिकीर'!
सोनाली जोशी
शनि, 10/10/2009 - 21:09
Permalink
मक्ता आवडला. छोट्या बहरामधली
मक्ता आवडला.
छोट्या बहरामधली गझल जास्तच आव्हान देते असे पुन्हा जाणवले.
(मतल्यामधे ओळ वाया घालवली असे मला तरी वाटले, पुनरुक्तीने इथे विशेष काही साधले असे जाणवले नाही. )
बेफिकीर
शनि, 10/10/2009 - 23:22
Permalink
सन्माननीय सोनालीताई, खरे तर
सन्माननीय सोनालीताई,
खरे तर या गझलेवर मी माझा प्रतिसाद दिलेला आहेच. पण आपला प्रतिसाद वाचून पुन्हा लिहावेसे वाटले.
मक्ता आवडला.
'शायराचे नाव गुंफलेले असलेला 'शेवटचा' शेर म्हणजे मक्ता! सदर गझलेत मक्ता नाही.
छोट्या बहरामधली गझल जास्तच आव्हान देते असे पुन्हा जाणवले.
भुजंगप्रयात २० मात्रांचे आहे. २० मात्रांचे वृत्त 'छोटी बहर' आहे असे मला तरी वाटत नाही. तसेच, या विशिष्ट वृत्तामुळे गझलकाराला या विशिष्ट गझलेत काहीही आव्हान पेलावे लागल्यासारखे (मला ) वाटत नाही.
(मतल्यामधे ओळ वाया घालवली असे मला तरी वाटले, पुनरुक्तीने इथे विशेष काही साधले असे जाणवले नाही. )
(माझ्यामते) संपूर्ण 'गझल'च प्रेमकविता व भावगीत या सदरात मोडते
-सविनय
'बेफिकीर'! (चर्चाभिलाषी)
जयन्ता५२
बुध, 14/10/2009 - 15:55
Permalink
केदार, पहायास ये झुंबरे
केदार,
पहायास ये झुंबरे तारकांची
सखे ये महाली..तुझी याद आली
अशा शांत वेळी कुठे मी स्वतःचा ?
तुझ्या मी हवाली !तुझी याद आली !
----- हे शेर खास! मतला मला आवडला.ही गझल गायकाच्या स्वरात ऐकायला मजा येईल!
सहज सुचवणी : (इतर चाल बांधली नसल्यास) तरन्नुममध्ये दरबारी रागात पेश करता येईल.
जयन्ता५२
बेफिकीर
बुध, 14/10/2009 - 22:43
Permalink
तरन्नुममध्ये दरबारी रागात पेश
तरन्नुममध्ये दरबारी रागात पेश करता येईल.
हे 'रागांबाबतचे' विवेचन फार 'आवडले'!
प्रकाशित झालेल्या इतर काही 'रचनांसाठी' एकेक चाल, राग द्यावात अशी नम्र विनंती!
क्रान्ती यांची 'मंजूर' ही रचना अतिशय 'टचिंग' वाटली. आपल्याकडून हृदयस्पर्शी चाल अपेक्षित!
-'सविनय'
बेफिकीर