विटाळ

माझ्याच आपल्यांना माझा विटाळ झाला,
गझलेतूनि मनाच्या मतला गहाळ झाला...

मी तोडली विचारांची लादलेली बंधने,
प्रत्येक विचार माझा एकटा अभाळ झाला...

निर्जीव भोवताली मी शोध घेतो मनांचा,
माझियासाठीच ईथला काळ वाचाळ झाला...

नाहीच केली पर्वा भूंकणार्या घशांची,
आवाजही तयांचा आता मवाळ झाला...

चालती ना पाऊले वाटा नियोजिलेल्या,
उगाच आठवांचा मागे प्रवाळ झाला...

--------------------------------- नचिकेत भिंगार्डे

गझल: 

प्रतिसाद

नचिकेतराव,
मतला जोरदार आहे. अभिनंदन.