मला वेळ नाही

जगावे कशाला, मला वेळ नाही
पुरे खेळ झाला, मला वेळ नाही

कपाटे स्मृतींची कधी आवरू मी?
किती वेळ झाला मला वेळ नाही

पुन्हा का हरावे? पुन्हा का रडावे?
तिच्या सांत्वनाला मला वेळ नाही

इशार्‍यात एका किती बारकावे
पुरे वाचण्याला मला वेळ नाही

घड्याळास जाई झुगारून काटा
म्हणे, "धावण्याला मला वेळ नाही!"

तुला काय वाटे, कसे ओळखू मी?
धुके पिंजण्याला मला वेळ नाही

निखारे विझाले, कुणी पेटवावे?
तिचा धीर गेला, मला वेळ नाही...

पुन्हा मांडले मी जुने मागणे अन्
पुन्हा तो म्हणाला, "मला वेळ नाही"

जगी काम मोठे असे काय आहे?
कशाला म्हणावे मला वेळ नाही?

नवे दु:ख माझे मला सावरू दे
ऋणे फेडण्याला मला वेळ नाही

जरा बोलकी हो, जरा सांग "नाही"
पुन्हा जागण्याला मला वेळ नाही

फुले पाहण्याची किती राहिलेली!
तुझ्या दर्शनाला मला वेळ नाही

खुळा काळ दारी पुन्हा थांबलेला
जरा सांग त्याला, मला वेळ नाही

साभार,
अलखनिरंजन

गझल: 

प्रतिसाद

दोन शेरांकडे दुर्लक्ष झाले याबद्दल क्षमा असावी:

जगी काम मोठे असे काय आहे?
कशाला म्हणावे मला वेळ नाही? (दोन शब्दांची चुकून अलटापालट झाली. क्षमा असावी.)

कृपया असे वाचावे:
"जगी काम मोठे असे काय आहे?
म्हणावे कशाला मला वेळ नाही?"

निखारे विझाले, कुणी पेटवावे?
तिचा धीर गेला, मला वेळ नाही... (अलामत सलामत राहिली नाही! क्षमस्व!)
हा शेर दुरुस्त करीन.

परत एकदा, many apologies!

वा!
छान
सुन्दर खुप मस्त आहे

इशार्‍यात एका किती बारकावे
पुरे वाचण्याला मला वेळ नाही

व्वा!

हा शेर आवडला.

बाकी:

निखारे फुले अन धुके खूप झाले
जुने चावण्याला मला वेळ नाही

असंबद्धता का 'तिच्या सांत्वनाला?'
यमक वाचण्याला मला वेळ नाही

चुकांची नको काळजी एवढीही
पुढे बोलण्याला मला वेळ नाही

सविनय
-बेफिकीर!

इशार्‍यात एका किती बारकावे
पुरे वाचण्याला मला वेळ नाही

घड्याळास जाई झुगारून काटा
म्हणे, "धावण्याला मला वेळ नाही!"

पुन्हा मांडले मी जुने मागणे अन्
पुन्हा तो म्हणाला, "मला वेळ नाही"

जगी काम मोठे असे काय आहे?
कशाला म्हणावे मला वेळ नाही?

वा! आवडली गझल!

आवडली गझल

इशार्‍यात एका किती बारकावे
पुरे वाचण्याला मला वेळ नाही

घड्याळास जाई झुगारून काटा
म्हणे, "धावण्याला मला वेळ नाही!"

पुन्हा मांडले मी जुने मागणे अन्
पुन्हा तो म्हणाला, "मला वेळ नाही">>> व्वा मस्तच

जगी काम मोठे......हा शेर एकंदर विषयाशी विसंगत वाटतो....आणि अनेक शेर असल्यामुळे एकसुत्रीपणा आलेला नाही...

पण काही शेर उत्तमच -

जगावे कशाला, मला वेळ नाही
पुरे खेळ झाला, मला वेळ नाही

कपाटे स्मृतींची कधी आवरू मी?
किती वेळ झाला मला वेळ नाही

पुन्हा का हरावे? पुन्हा का रडावे?
तिच्या सांत्वनाला मला वेळ नाही

वा !

तुला काय वाटे, कसे ओळखू मी?
धुके पिंजण्याला मला वेळ नाही

सहीच !

मधु, भूषण, क्रांति, मिल्या, श्रीवत्स,

आपल्या उदार प्रतिसादाबद्दल ऋणी आहे!

छान बरका...

कपाटे स्मृतींची कधी आवरू मी?
किती वेळ झाला मला वेळ नाही

पुन्हा का हरावे? पुन्हा का रडावे?
तिच्या सांत्वनाला मला वेळ नाही

इशार्‍यात एका किती बारकावे
पुरे वाचण्याला मला वेळ नाही

घड्याळास जाई झुगारून काटा
म्हणे, "धावण्याला मला वेळ नाही!"

इशार्‍यात एका किती बारकावे
पुरे वाचण्याला मला वेळ नाही

वा!

तुला काय वाटे, कसे ओळखू मी?
धुके पिंजण्याला मला वेळ नाही

वा! धुके पिंजण्याची कल्पना आवडली.

एकंदर गझल आवडली. मला वेळ नाही हे अन्त्ययमकही.

दशरथ, चित्तरंजन!

मनापासून धन्यवाद!

खुळा काळ दारी पुन्हा थांबलेला
जरा सांग त्याला, मला वेळ नाही

सुंदर !

इशार्‍यात एका किती बारकावे
पुरे वाचण्याला मला वेळ नाही
वा!
मला तरी कुठे आहे..:-)