आहे मीही...
आहे मीही ओढा साधा ओसरणारा!
वरवर केवळ अथांग सागर भासवणारा!
रोजच पडतो प्रश्न अताशा निजताना, का..
दूर राहिला हात मलाही जोजवणारा?
अजून मजला समजत नाही समोरचेही
जणू आंधळा हत्तीला मी चाचपणारा!
अबोल अश्रू म्हणजे निव्वळ खारट पाणी
आक्रोश हवा काळिज अवघे पिळवटणारा!
प्राणीमात्रांच्या हव्यासा अंत कोठला?
उडण्याचीही इच्छा धरतो सरपटणारा!
सांग वाटतो आज असा का हिरमुसलेला..
चेहरा तुझा चन्द्रालाही लाजवणारा?
लहरी राजा, स्वार्थी नेते, प्रजा आंधळी,
आणि कायदा...सत्यालाही भोसकणारा!
पुसे धुलीकण वाटेवरला हे वार्याला..
"कुठे थबकला पाय सारखा वणवणणारा?"
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
सोम, 07/09/2009 - 22:16
Permalink
लहरी राजा, स्वार्थी नेते,
लहरी राजा, स्वार्थी नेते, प्रजा आंधळी,
आणि कायदा...सत्यालाही भोसकणारा!
वा!
भूषण कटककर
सोम, 07/09/2009 - 22:51
Permalink
जोमदारशी गझल जाहली वाचुन
जोमदारशी गझल जाहली वाचुन माझी
'अबोल अश्रू' शेर लांबवर आठवणारा
-सविनय
बेफिकीर!
भूषण कटककर
सोम, 07/09/2009 - 22:53
Permalink
जोमदारशी गझल जाहली वाचुन
जोमदारशी गझल जाहली वाचुन माझी
'अबोल अश्रू' शेर लांबवर आठवणारा
-सविनय
बेफिकीर!
चित्तरंजन भट
बुध, 09/09/2009 - 14:36
Permalink
एकंदर छान झाली आहे गझल.
एकंदर छान झाली आहे गझल. आक्रोश हवा हे लयीत म्हणताना थोडी अडचण झाली.
अजून मजला समजत नाही समोरचेही
जणू आंधळा हत्तीला मी चाचपणारा!
छान. तुमच्या चाचपण्याच्या धरतीवरचा एक शेर माझ्याकडे अनेक दिवसांपासून पडून आहे. गझल टाकीनच.
मधुघट
गुरु, 10/09/2009 - 11:55
Permalink
खूप खूप धन्यवाद! भूषणजी, आपला
खूप खूप धन्यवाद!
भूषणजी,
आपला शेरही छान झालाय! धन्यवाद!
चित्तरंजनजी,
आपल्या प्रोत्साहनाने धीर आला! आक्रोश लयीत बसत नाही हे मान्य्...पण मात्रा तर सगळीकडे २४च आहेत! अन तो शब्द नीट उच्चारला तर काळिज चा उच्चार करताना 'ज' चा पाय मोडावा लागतोय! तरच लय सांभाळली जातेय!