तुझी ही बेफिकीरी 'बेफिकिर' थांबेल त्यावेळी
मला समजायचे केव्हा तुझा मी कोण आहे ते?
कधी समजायचे की नेमका मी कोण आहे ते?
स्वतःच्या वर्णनांमध्ये हयाती चालल्या तुमच्या
कुणी सांगाल का यारो मला मी कोण आहे ते?
अशासाठीच माझा जीव मीही सोडला होता
कळावे संपताना हे, तुला मी कोण आहे ते
अशासाठीच माझा जीव मी सांभाळला होता
कळावे जीव जाताना तुझा, मी कोण आहे ते
तसाही वेळ नाही राहिलेला फारसा आता
कशाला जायचे समजायला, मी कोण आहे ते
किती उद्योग लोकांना रिकाम्या वेळचे येथे
"असा मी कोण आहे" ते, "तसा मी कोण आहे" ते
तुझी ही बेफिकीरी 'बेफिकिर' थांबेल त्यावेळी
तुला समजेल ज्यावेळी खरा मी कोण आहे ते
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
सोम, 07/09/2009 - 22:20
Permalink
किती उद्योग लोकांना रिकाम्या
किती उद्योग लोकांना रिकाम्या वेळचे येथे
"असा मी कोण आहे" ते, "तसा मी कोण आहे" ते
व्वा!
पूर्वग्रहदूषितपणे न पाहिले तर छानच आहे.
(येथे) मुळे कोणी विपरीत अर्थ घेऊ नये म्हणून सांगितले.
बेफिकीर
बुध, 09/09/2009 - 19:54
Permalink
अजयराव, जिथे झाले तिथे बोला,
अजयराव,
जिथे झाले तिथे बोला, जिथे नाही तिथे टाळा
तुम्हाला माहिती नाही 'खरा' मी कोण आहे ते
-सविनय
बेफिकीर!