दुःख गोठलेले मी... !

...................................
दुःख गोठलेले मी... !
...................................

दुःख गोठलेले मी; ओघळायचो नाही !
अन् कधी कुणालाही मी कळायचो नाही !

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

ब्याद मी स्वतःसाठी अन् बला तुझ्यासाठी...
टाळले तरी आता मी टळायचो नाही !

दाट दाट स्मरणांच्या जंगलात शिरलो की...
मी पुन्हा मलासुद्धा आढळायचो नाही !

ही धरा धरेना का कोंब एकही साधा ?
मी इथे पुन्हा आता कोसळायचो नाही !

सांग सांग गतकाळा, सांग हे भविष्याला...
गाडला न गेलो मी...मी जळायचो नाही !

पाळल्या न दोघांनी दोन या अटी साध्या...
त्रास तू न मज द्यावा...मी छळायचो नाही !

मान मी तुझी कविते का बरे झुकू द्यावी ?
तोल मी तुझा आहे...मी ढळायचो नाही !

चीड येत गेली मज यामुळेच माझीही...
वादळायचे तेव्हा वादळायचो नाही !

मी मुळात मातीचा; राहणार मातीचा...
मी हवेमुळे काही उन्मळायचो नाही !

पेटलोच आहे मी; पेटवीन अंधारा...
मी असा तसा आता मावळायचो नाही !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

सुरेख! खालची ओळ तर फारच.

ब्याद मी स्वतःसाठी अन् बला तुझ्यासाठी...
टाळले तरी आता मी टळायचो नाही !

वाव्वा!

मी मुळात मातीचा; राहणार मातीचा...
मी हवेमुळे काही उन्मळायचो नाही !

वाव्वा! ही द्विपदी तर भयंकर आवडली.

पेटलोच आहे मी; पेटवीन अंधारा...
मी असा तसा आता मावळायचो नाही !

व्वा!

गझल नेहमीप्रमाणे देखणी, दर्जेदार आहे.

सहमत!

गझल नेहमीप्रमाणे आहेच!

मान मी तुझी कविते का बरे झुकू द्यावी ?
तोल मी तुझा आहे...मी ढळायचो नाही !

वा! कमालीची अप्रतिम गझल!

छान गझल!

सांग सांग गतकाळा, सांग हे भविष्याला...
गाडला न गेलो मी...मी जळायचो नाही !

पाळल्या न दोघांनी दोन या अटी साध्या...
त्रास तू न मज द्यावा...मी छळायचो नाही !

मान मी तुझी कविते का बरे झुकू द्यावी ?
तोल मी तुझा आहे...मी ढळायचो नाही !

चीड येत गेली मज यामुळेच माझीही...
वादळायचे तेव्हा वादळायचो नाही !

दुःख गोठलेले मी; ओघळायचो नाही !
दु:ख गोठलेले मी; = याचा अर्थ नीट समजला नाही. म्हणजे वाक्प्रयोग समजला नाही.
त्याचप्रमाणे, मी जळायचो नाही, मी छळायचो नाही = हे वाक्प्रयोग जरा खटकले. मला यात भूतकाळ वाटला. तो तसाच आहे की वेगळा अर्थ अभिप्रेत आहे?
बाकी तुमच्या गझलेबाबत मी काय बोलणार?
कलोअ. चुभूद्याघ्या.

व्वा मस्त गझल नेहमीप्रमाणेच

मी मुळात मातीचा; राहणार मातीचा...
मी हवेमुळे काही उन्मळायचो नाही !>>> व्वा हा तर लाजवाब आहे

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

ब्याद मी स्वतःसाठी अन् बला तुझ्यासाठी...
टाळले तरी आता मी टळायचो नाही !
हे पण आवडले..

बाकी अजय म्हणतात ते काही अंशी पटली

मळणार नाही, टळणार नाही असे जास्त संयुक्तिक वाटले असते असे वैयक्तिक मत.. अर्थात प्रदिपरावांना सुचना करायची पात्रता माझी नाही तेव्हा चु.भू.दे.घे.

मळायचो, टळायचो, मावळायचो हे तिन्ही फार आवडले.
सोनाली

दिलखुलास प्रतिसाद देणाऱया सगळयांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

(नेहमीप्रमाणे) सुंदर.
छळायचो, टळायचो, आढळायचो हे आवडले.

जे उत्तम आहे ते उत्तमच आहे. नि:शंकपणे!

दुःख गोठलेले मी; ओघळायचो नाही !
अन् कधी कुणालाही मी कळायचो नाही ! - सुंदर मतला!

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही ! - अप्रतिम शेर!

ब्याद मी स्वतःसाठी अन् बला तुझ्यासाठी...
टाळले तरी आता मी टळायचो नाही ! - छान!

दाट दाट स्मरणांच्या जंगलात शिरलो की...
मी पुन्हा मलासुद्धा आढळायचो नाही ! - इच्छा / अंदाज - दोन्ही अर्थाने चांगला!

ही धरा धरेना का कोंब एकही साधा ?
मी इथे पुन्हा आता कोसळायचो नाही ! - व्वा!

सांग सांग गतकाळा, सांग हे भविष्याला...
गाडला न गेलो मी...मी जळायचो नाही ! - 'आत्मा' ! वा वा!

पाळल्या न दोघांनी दोन या अटी साध्या...
त्रास तू न मज द्यावा...मी छळायचो नाही ! फार सुंदर शेर!

मान मी तुझी कविते का बरे झुकू द्यावी ?
तोल मी तुझा आहे...मी ढळायचो नाही ! - अगदी खरे!

चीड येत गेली मज यामुळेच माझीही...
वादळायचे तेव्हा वादळायचो नाही ! - खरे आहे.

मी मुळात मातीचा; राहणार मातीचा...
मी हवेमुळे काही उन्मळायचो नाही ! - 'वादळामुळे काही'?

पेटलोच आहे मी; पेटवीन अंधारा... - 'अंधाराला'? 'पेटवीन तमही मी'
मी असा तसा आता मावळायचो नाही ! - असा तसा हे फार छान!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एक गुप्त खपली मी... झाकतो किती जखमा
भेटुनी कुणालाही ... भळभळायचो नाही

-सविनय
बेफिकीर!

आज पुन्हा तुमच्या काही गझला वाचल्या. ही गझल फार आवडली.
मी मुळात मातीचा; राहणार मातीचा...
मी हवेमुळे काही उन्मळायचो नाही !
हा शेर तर अप्रतिम आहे. आधी त्याला दाद द्यायची राहिली.

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

हा शेर फार आवडला.

वा वा वा वा

क्या बात है प्रदीपराव,

नेहमीप्रमाणे अतिशय सही गझल. हार्दिक अभिनंदन.

ही धरा धरेना का कोंब एकही साधा ?
मी इथे पुन्हा आता कोसळायचो नाही !

अतिशय सुंदर. अप्रतिम. क्या बात कही है!

आपला,
(तृप्त) धोंडोपंत

वा!

पेटलोच आहे मी; पेटवीन अंधारा...
मी असा तसा आता मावळायचो नाही !

ही धरा धरेना का कोंब एकही साधा ?
मी इथे पुन्हा आता कोसळायचो नाही !

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

हे खूप आवडले !

प्रदीप, सगळी गझल आवडली, सगळी गझल कॉपी पेस्ट करण्या ऐवजी जे शेर खूप जास्त आवडले ते खाली देतोय :)

दुःख गोठलेले मी; ओघळायचो नाही !
अन् कधी कुणालाही मी कळायचो नाही !

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

ही धरा धरेना का कोंब एकही साधा ?
मी इथे पुन्हा आता कोसळायचो नाही !

मी मुळात मातीचा; राहणार मातीचा...
मी हवेमुळे काही उन्मळायचो नाही !

गझल आवडलीच.

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

ओहो, क्या बात है...

-दिलीप बिरुटे

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !
खरे आहे. आवडले.

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !
अप्रतीम गझल. तुमच्याबद्दल काय म्हणायचे ! केवळ तुमच्यासाठीच अनेकदा साइटवर येत असतो.