कर्ज
उपकाराचे तुझ्या जीवना कर्ज जुने सांभाळत आले
चुकवाया मी तुझी तारणे, किती बंधने पाळत आले
किती टाळले तरिही त्यांना माझ्यावाचुन थारा नव्हता
तुझे भास सावलीसारखे पायांशी घोटाळत आले
नभछाया वा मळभकाजळी निष्प्रभ का करते सूर्याला ?
ग्रहण क्षणाचे सुटता त्याचे किरण पुन्हा तेजाळत आले
किती काळ या अधांतरी वाटेवर अजुनी प्रवास माझा ?
उत्तर या साध्या प्रश्नाचे प्राक्तन माझे टाळत आले
भलते होते वेड जिवाला राखेतुन अवतार घ्यायचे,
अतिरेकी हट्टापायी त्या, सर्वस्वाला जाळत आले
कुणी द्यायची साथ कुणाची, कधीच त्यांचे ठरले होते,
तुझी वाट शोधली सुखाने, मला दु:ख धुंडाळत आले
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
सोम, 24/08/2009 - 17:06
Permalink
क्रांती, चांगली रचना.
क्रांती,
चांगली रचना.
ज्ञानेश.
सोम, 24/08/2009 - 20:16
Permalink
वा.. नभछाया आणि शेवटचे दोन
वा..
नभछाया आणि शेवटचे दोन शेर खूपच आवडले.
आनंदयात्री
सोम, 24/08/2009 - 22:44
Permalink
शेवटाचे दोन वावावा.... फार
शेवटाचे दोन वावावा....
फार आवडले..
भूषण कटककर
मंगळ, 25/08/2009 - 09:35
Permalink
कुणी द्यायची साथ कुणाची कधीच
कुणी द्यायची साथ कुणाची कधीच त्यांचे ठरले होते
हा शेर फार आवडला.
अभिनंदन!
चित्तरंजन भट
मंगळ, 25/08/2009 - 13:03
Permalink
कुणी द्यायची साथ कुणाची, कधीच
वाव्वा! फार फार छान.
पुलस्ति
मंगळ, 25/08/2009 - 20:50
Permalink
वा! भास आणि दु:ख हे शेर
वा! भास आणि दु:ख हे शेर आवडले!!
श्रीवत्स
बुध, 26/08/2009 - 15:29
Permalink
नभछाया पासून सर्व शेर मस्त !
नभछाया पासून सर्व शेर मस्त ! वा छानच !
भूषण कटककर
बुध, 02/09/2009 - 21:56
Permalink
किती काळ या अधांतरी वाटेवर
किती काळ या अधांतरी वाटेवर अजुनी प्रवास माझा ?
उत्तर या साध्या प्रश्नाचे प्राक्तन माझे टाळत आले
व्वा! हाही फार सुंदर शेर क्रान्तीजी!
तशी मलाही घाई नव्हती पुढे काय हे तपासण्याची
टाळत आले मृत्यूला मी, जन्मावर रेंगाळत आले
सविनय
-'बेफिकीर'!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुक्र, 04/09/2009 - 19:32
Permalink
मस्त !
मस्त !
दशरथयादव
शनि, 05/09/2009 - 14:57
Permalink
शेर आवडले किती काळ या अधांतरी
शेर आवडले
किती काळ या अधांतरी वाटेवर अजुनी प्रवास माझा ?
उत्तर या साध्या प्रश्नाचे प्राक्तन माझे टाळत आले
भलते होते वेड जिवाला राखेतुन अवतार घ्यायचे,
अतिरेकी हट्टापायी त्या, सर्वस्वाला जाळत आले
मिल्या
गुरु, 10/09/2009 - 10:15
Permalink
व्वा एकदम मस्त गझल भास,
व्वा एकदम मस्त गझल
भास, प्राक्तन आणि शेवटचा शेर खूप आवडले
चक्रपाणि
गुरु, 10/09/2009 - 10:43
Permalink
दुसरा व शेवटचा शेर फार फार
दुसरा व शेवटचा शेर फार फार आवडले.
बेफिकीर
सोम, 01/02/2010 - 18:56
Permalink
सुंदर गझल. पुन्हा वाचली.
सुंदर गझल. पुन्हा वाचली.
जयश्री अंबासकर
मंगळ, 02/02/2010 - 16:50
Permalink
सही यार..... कमाल आहे गझल :)
सही यार..... कमाल आहे गझल :)
वैभव जोशी
गुरु, 04/02/2010 - 10:23
Permalink
गझल छानच. विशेषतः तुझे भास
गझल छानच. विशेषतः
तुझे भास सावलीसारखे पायांशी घोटाळत आले
किती काळ या अधांतरी वाटेवर अजुनी प्रवास माझा ?
तुझी वाट शोधली सुखाने, मला दु:ख धुंडाळत आले
वा ! वा ! सुरेख उतरल्या आहेत ह्या ओळी.
शुभेच्छा