पाहिजे ते..

आपला अधिकार घे खेचून आता
पाहिजे ते मिळव तू भांडून आता

शांततामय बैठकांना अंत नाही
पाहिजे ते मिळव तू भांडून आता

ऐक मित्रा, फक्त माझा एक सल्ला
पाहिजे ते मिळव तू भांडून आता

तुडविले जाऊन सारे जीव गेले
देह घे निष्प्राण ते वेचून आता

काम आठवलेच आहे तर करूया..
अन्यथा जाईल ते राहून आता..

गझल: 

प्रतिसाद

केदार,

'गझल' केल्याबद्दल अभिनंदन! (प्रकाशित )

तसेच, आणखीन एका गोष्टीबद्दल! जी, सगळ्या जगात घडते, पण 'आपल्या'बाबतीत घडली की आयुष्याचा खरा अर्थ कळतो असे 'म्हणतात'!

मनापासून अभिनंदन!

गझल छान आहे. शेवटचे दोन आवडले.
पाहिजे ते मिळव तू भांडून आता- याची पुनरावृत्ती झाली आहे असे वाटते-भांडून च्या ऐवजी दुसर्‍या/तिसर्‍या शेरामध्ये दुसरे शब्द घातल्यास गझल अजून सुंदर होईल असे वाटते. अर्थात शब्द उतरले ते उतरले, शेवटी त्या भावना आहेत, त्यात बदल कसा होणार, याची जाण आहे.-सविनय.

धन्यवाद भूषण.

रचना सहज, बोलकी आहे. भावना नीट पोचत आहेत.

मा.अलका,

दुसरी ओळ जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा वापरली आहे. उर्दू गझलेत हे आढळते. मला स्वतःच्या गझलेबाबत करुन पाहायचे होते. हा प्रयोग इतर मराठी गझलकारांनी केला आहे का, याबाबत या जालस्थळावरील तज्ञ तसेच विश्वस्तही सांगू शकतील.
प्रतिसादाबद्दल आभार.

चित्तरंजन,
आभारी.

सहमत व असहमत

केदार,

आदरपुर्वक!

१. 'मला करून पाहायचे होते' - सहमत! हे आपले मत फार आवडले.

२. उर्दू गझलेत हे आढळते - माझ्या वाचनात नाही. एकाहून जास्त 'मतल्यासारखेच' शेर अनेक जणांनी घेतले. पण संपूर्ण ओळ तशीच हे मी तरी वाचलेले नाही.

जिगरचे काही शेर, ज्यात मतल्यानंतर परत तसेच शेर आहेत.

१. दिलमे किसीकी राह किये जा रहा हूं मै
कितना हसी गुनाह किये जा रहा हूं मै

दुनिया-ए-दिल तबाह किये जा रहा हूं मै
सर्फे निगाहो आह किये जा रहा हूं मै

फर्द-ए-अमल सियाह किये जा रहा हूं मै
रहमत को बेपनाह किये जा रहा हूं मै

२.
ऑखोंमे बसके दिलमे समाकर चले गये
ख्वाबिदा जिंदगी थी जगाकर चले गये
चेहरेतक अस्तीन वो लाकर चले गये
क्या राज था कि जिसको छुपाकर चलेगये
रगरगमे इस तरहा वो समाकर चले गये
जैसे मुझीको मुझसे चुराकर चले गये

माझ्यामते असे जौकने खूपवेळा केले असावे. मात्र, एकच ओळ पूर्णपणे तशी हे वाचले नाही. आपण पाहिले असल्यास क्रुपया सांगावेत. हा प्रतिसाद देण्याचे कारणः

आपल्या या गझलेतील तीनही शेरांमधे दुसरी ओळ तीच आहे. असे करण्याचे कारण 'काही ना काही विशेष वैविध्यपूर्ण आशय सांगायचा' असे असू शकते. तसे वैविध्य मला (आशयाचे ) पहिल्या तीन शेरांमधे कमी वाटले. म्हणून हे लक्षात आले नाही की एक ओळ तीन शेरांमधे तशीच घेण्याची आपली भूमिका काय असावी.

आपला अधिकार खेचून घे, कारण शांततामय बैठकांना अंत नाही, एवढा सल्ला ऐक मित्रा - पाहिजे ते मिळव तू भांडून आता ! अशा पद्धतीने मी त्याचा अर्थ लावला. याहून भिन्न अभिप्रेत असल्यास जाणून घ्यायला मजा येईल.

आदरपुर्वक!

करून पहायचे होते - :) अजून धीर धरता आला असता असे वाटते..
व्यक्तिशः मत - अजून सफाईदारपणा हवा होता.

काम आठवलेच आहे तर करूया..
अन्यथा जाईल ते राहून आता..

हा शेर छान आहे. पण 'पुनरावृत्ती'वाले शेर काही जमले नाहीत असे वाटते.
चूक भूल क्षमस्व.

'जोश' मलीहाबादी उदाहरण:

मतला
बेदर्द मैंने तुझको भुलाया नहीं हुनोज़
नक्शे-ख़याल दिल से मिटाया नहीं हुनोज़

मक्ता
मरकर भी आयेगी ये सदा कब्रे जोश से
बेदर्द मैंने तुझको भुलाया नहीं हुनोज़

हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता ह्या गझलेत 'एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता' ही ओळ पुन्हा आली आहे.

धन्यवाद, चित्तरंजन.
भूषण,
उर्दूतील अशी उदाहरणे आठवली की जरूर देईन.
ते तीन शेर स्वतंत्रपणे विचारात घ्यावेत. बाराखडीनुसार, गझल उलगडत नाही...

ज्ञानेश,
तुझे मत विचाराधीन.

खरच की!

तसे उदाहरण आहे खरे! जोशची ती गझल मी शोधून वाचली.

केदार,

आपल्या गझलेतील शेवटचे दोन शेर वेगळ्या विषयावरचे आहेत. ( उलगडल्यासारखे नाहीत.)
जोशची ती गझल 'उलगडत' नसली तरी एकाच विषयावर सगळे शेर ( भावनेचे तोचतोचपणा!) आहेत. त्यामुळे, मला आपल्या या गझलेतील शेवटचे दोन शेर एकदम फ्रेश वाटले.

गझल बाराखडीनुसार उलगडत नाही म्हणजे काय?

अकराव्या शतकापासुन गझल उलगडत नाही.

अजून एक उदाहरण देतो.. इथलेच.

आहे मनात काही
नाही खिशात काही..

नुसतेच भेटणे की,
आहे मनात काही?

(कवी- जयन्ता)